पुणे: राज्यात मुसळधार पावसाने विश्रांती घेतली आहे. अशातच आज आणि उद्या पुणे शहर परिसरात आज (मंगळवारी व बुधवारी) मुसळधार पावसाचा 'यलो अलर्ट' हवामान विभागाने दिला आहे. मात्र, गुरुवार (दि. १२) ते रविवार (दि. १५सप्टेंबर) यादरम्यान पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा (Pune Rain Update) अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
शहरात २ सप्टेंबरनंतर राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार (Pune Rain Update) पाऊस कमी झाला आहे. काही भागात सरी बरसताना दिसत आहे. पुणे शहर (Pune Rain Update) परिसरासह घाटमाथ्यावरही (आज आणि उद्या) मंगळवारी आणि बुधवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यानंतर पाऊस दडी मारण्याची शक्यता आहे. शहरात १५ सप्टेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहील. काही भागांत या कालावधीत रिमझिम पावसाचा अंदाज आहे.
राज्यात काही भागात मंगळवारी आणि बुधवारी मुसळधार पावसाचा (Pune Rain Update) इशारा देण्यात आला आहे. मात्र, गुरुवारपासून (१२ सप्टेंबर) पुढे किमान पाच दिवसांचा खंड आहे. एकूणच, मान्सून परतीच्या प्रवासाच्या मूडमध्ये आहे. राज्यात १२ सप्टेंबरपासून पावसाचं प्रमाण कमी होत आहे. मात्र, मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची अधिकृत घोषणा अद्याप हवामान विभागाकडून करण्यात आलेली नाही.
या ठिकाणी अलर्ट जारी
ऑरेंज अलर्टः भंडारा (१०), गोंदिया (१०), नागपूर (१०); यलो अलर्टः रायगड (१०, ११), रत्नागिरी (१०, ११), सिंधुदुर्ग (१०, ११), धुळे (१०, ११), नंदुरबार (१०, ११), जालना (१०, ११), नाशिक (१०, ११), पुणे (१०, ११), कोल्हापूर (१०, ११), सातारा (१०, ११), छत्रपती संभाजीनगर (१०, ११), जालना (१०, ११), परभणी (१०, ११), बीड (११), अकोला (१०, ११), अमरावती (१०, ११), भंडारा ((१०, ११), बुलडाणा (१०, ११), चंद्रपूर (१०, ११), गडचिरोली (१०, ११), गोंदिया (११) या ठिकाणी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.