Pune Rain news: पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) आणि मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात गेल्या 24 तासात 55 मिमी पाऊस झाला आहे. पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात चांगल्या प्रमाणात पाऊस पडल्याने धरणात चांगल्या प्रमाणात पाणीासाठा झाला आहे. पवना धरणात पाणीसाठा 19.45  टक्के झाला आहे. मागच्या वर्षी याच दिवशी पवना धरणात 34.28 टक्के पाणीसाठा होता.  1 जूनपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 392  मिमी पाऊस झाला असून त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात 2.6 टक्यांनी वाढ झाली आहे.



राज्यातीसल अनेक जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर चांगलाच वाढलेला दिसत आहे. अशातच पुणेकरांसाठी देखील एक आनंदाची बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरण क्षेत्रात चांगल्या पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यामध्ये रात्रभर झालेल्या पावसामुळं पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरण क्षेत्रामध्ये चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. यामुळं धरणाच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांवर जे पाणी कपात लागू करण्यात आली आहे ती लवकरच दूर होण्याची शक्यता आहे. 


कोणत्या धरण क्षेत्रात किती पाऊस


सध्या पुणे धरण परिसरात चांगला पाऊस सुरु आहे. कालपासून पुणे शहराला पिण्यासाठी आणि जिल्ह्याला शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रात्रभर पाऊस सुरु आहे. त्यामुळं पाणीसाठ्यात बर्‍यापैकी वाढ झाली आहे. खडकवासला 18 मिमी, पानशेत 68 मिमी, वरसगाव 70 मिमी आणि टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 65 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर या चारही धरणांचा उपयुक्त पाणीसाठा 3.67 टीएमसी झाला आहे. सोमवारपासून पुण्यात सात दिवसांसाठी पुण्यात पाणीकपात लागू करण्यात आली आहे. हा पाऊस असाच पडत राहिल्यास पुणेकरांची पाणी कपातीतून  सुटका होण्याची शक्यता आहे.


पिंपरी चिंचवडमध्येही काही दिवसात पाणीकपात होण्याची शक्यता होती. ऐन पावसाळ्यात त्यांच्यावर पाणी कपातीच संकट ओढवणार होतं. पाठ बंधारे विभागाने पाणी कपात करण्याच्या सूचना महापालिकेला दिलेल्या होत्या. पावसाने ओढ दिल्याने शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरणात धरणात केवळ साडे सोळा टक्केच पाणी साठा शिल्लक होता. मात्र धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची समस्या सुटणार असल्याचं चित्र आहे.