Pune Rain Live Updates: पुण्याच्या मावळ तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी

शनिवारी संध्याकाळी पुण्याला पावसाने चांगलच झोडपून काढले. पुणे शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठलंय.

एबीपी माझा वेबटीम Last Updated: 10 Oct 2021 04:10 PM
पुण्याच्या मावळ तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी ही तुफान पावसाने हजेरी लावली

पुण्याच्या मावळ तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी ही तुफान पावसाने हजेरी लावली. सकाळपासून ऊन होते. मात्र, दुपारी अचानक पावसाचे आगमन झाले. त्यामुळे सर्वांची चांगलीच तारांबळ उडाली.

पुण्यात काल मुसळधार पाऊस, घरात-दुकानात पाणी शिरल्यानं अनेकांचं नुकसान

पुण्यातील धानोरी, लोहगाव, कळस या भागात जोरदार पाऊस झालाय. या भागातील डोंगरावरून येणारं पाणी सखल भागात साठलं . ज्यामुळे रस्त्यांवर पाण्याचा मोठा प्रवाह वाहायला लागला. अनेक सोसायटी आणि घरांमधेही पाणी शिरलं. पुणे शहरातील येरवडा, टिंगरेनगर, धानोरी, नागपूर चाळ, मुंजोबा वस्ती, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, कात्रज, धनकवडी, वाकडेवाडी, ताडीवाला रोड, वाडिया कॉलेज, या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठलं होतं. तर अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटनाही घडल्या. 

काल संध्याकाळी पुण्याला झोडपणाऱ्या पावसाची रात्रीपासून विश्रांती, घरात-दुकानात पाणी शिरल्यानं अनेकांचं नुकसान

शनिवारी पुणे शहराला परतीच्या पावसानं झोडपलंय. काल संध्याकाळी 6 च्या सुमारास पुण्यात जोरदार पाऊस झाला. तासभर झालेल्या या पावसानं पुणेकरांची तारांबळ उडाली. जोरदार पावसामुळं अनेक सखल भागात पाणी साचलं होतं.

पुण्यातील पूर्व भागात मुसळधार पाऊस 5 पासून सुरू

पुण्यातील पूर्व भागात मुसळधार पाऊस 5 पासून सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी घरांमध्ये शिरल्याच्या घटना घडल्या. पुण्यातील धानोरी भागात काही सोसायट्यांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरले. धानोरी लोहगाव मुख्य रस्त्यावर पाण्याचा लोंढा आल्याने अनेक गाड्या बंद पडल्या. धानोरी लोहगाव मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. 

शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साठलं

शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे येरवडा, टिंगरेनगर, धानोरी, नागपूर चाळ, मुंजोबा वस्ती, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, कात्रज, धनकवडी, वाकडेवाडी, ताडीवाला रोड, वाडिया कॉलेज, या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठलंय. अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटनाही घडल्यात.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे एअरपोर्टवरुन येताना येरवडा भागात एक तास वाहतूक कोंडीत अडकले

पुण्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे एअरपोर्टवरुन येताना येरवडा भागात एक तास वाहतूक कोंडीत अडकले होते. काही वेळापूर्वी अजित पवार या वाहतूक कोंडीतुन निघून बारामतीकडे रवाना झालेत. परंतु, पुण्यातील पुणे-अहमदनगर रस्त्यावर अजूनही मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी आहे.

पिंपरी चिंचवडमध्येही पावसाने थैमान

पिंपरी चिंचवडमध्येही पावसाने चांगलेच थैमान घातले. सायंकाळी सात वाजता सुरू झालेल्या पावसाने तुफान हजेरी लावली. नंतर पावसाचा जोर ओसरला मात्र संततधार कायम होती. त्यामुळेच अनेक सखल भागात पाणी साचल्याचे चित्र आहे. आकुर्डीत रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते तर देहूरोडमधील काही सोसायट्यांमध्ये ही पाणी शिरले होते.

पार्श्वभूमी

पुणे : आज (शनिवारी) संध्याकाळी पुण्याला पावसाने चांगलच झोडपून काढले. आधी पुण्यातील उत्तर भागातील धानोरी, लोहगाव, कळस या भागात पावसाला सुरुवात झाली. या भागातील डोंगरावरून येणारं पाणी सखल भागात साठलं. ज्यामुळे रस्त्यांवर पाण्याचे लोंढे वहायला लागले. अनेक सोसायटी आणि घरांमधेही पाणी शिरले आहे. संध्याकाळी सव्वा सहा वाजता मुसळधार पावसाचा हा रोख मग शहराकडे वळला आणि संपुर्ण पुण्यात जोरदार पाऊस पडला. शहरातील येरवडा, टिंगरेनगर, धानोरी, नागपूर चाळ, मुंजोबा वस्ती, महाराष्ट्र.हौसिंग बोर्ड, कात्रज, धनकवडी, वाकडेवाडी, ताडीवाला रोड, वाडिया कॉलेज, या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठलं आणि अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटनाही घडल्यात. संध्याकाळी साडेसातनंतर पावसाचा जोर ओसरला असुन रिमझिम पाऊस सुरु आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.