पुणे:  पुण्याच्या कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघाताच्या (Pune Porsche Car Accident) दिवशी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांनी मध्यरात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यानंतर सुनील टिंगरेंकडे देखील संशयानं पाहिलं जात आहे. .  या प्रकरणी  उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणी सुनील टिंगरेंची तीन ते चार तास चौकशी झाल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे.


अजित पवार म्हणाले, आपल्या काही लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे. या बदनामीमुळे  शेवटी सुनीलची तीन ते चार चौकशी झाली. त्या चौकशीत जे काही घडले ते सुनीलने स्पष्ट सांगितले. यामध्ये सुनीलचा दुरान्वये देखील संबंध नव्हता. परंतप कारण नसताना काही जणांनी त्याचे नाव यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला. एखाद्या आमदाराच्या मतदारसंघात काही प्रकार घडला असेल तर  तिथल्या आमदाराला रात्री जाणे भाग आहे. आधार  देणे हे त्याचे कर्तव्य आहे. घटनास्थळी काय घडले आमदाराला पोलिस स्थानकात गेल्यावरच कळणार अगोदर त्याला काय स्वप्न पडणार का? 


पक्षाची बदनामी होणार नाही, असे कृत्य करु नका; अजित पवारांच्या सूचना


महिला , पुरुष, युवक, युवतींनी व्यवस्थित राहा, कुठेही पक्षाची बदनामी होणार नाही अशा प्रकारचे कृत्य तुमच्या हातून होऊ देऊ नका. मधल्या काही घटना पुण्याला बदनाम करणाऱ्या झाल्या. त्या प्रकरणात कडक अॅक्शन घेण्यास आपण मागे पु़ढे पाहिले नाही. जे जे त्या प्रकरणात होते त्यांच्या चौकशा करून त्यांच्यावर कारवाई केली.  परंतु अशा काही घटना घडल्या तर यामध्ये काही चांगले देखील भरडले जातात, असे देखील अजित  पवार म्हणाले. 


सुनील टिंगरेंच्या स्पष्टीकरणानंतर  जनतेचा रोष कायम


अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. तर सुनिल टिंगरे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. कल्याणीनगर  प्रकरणातील आरोपी मुलगा हा अल्पवयीन असून, त्याची जामिनावर सुटका झाली आहे. या प्रकरणात स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांचं नाव जोडलं जाते आहे. कारण घटनेच्या मध्यरात्री सुनील टिंगरे हे  येरवडा पोलीस स्टेशनमध्ये होते.  त्यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचीही चर्चा आहे. आमदार सुनील टिंगरे यांनी   स्पष्टीकरण दिल्यानंतरही जनतेचा रोष कायम आहे.  


हे ही वाचा :


लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांनी सांगितली महत्त्वाची गोष्ट, अंगणवाडी सेविकांना वेगळे 50 रुपये मिळणार