Pune Porsche Car Accident : पुण्यात पोर्शे कारने दोन इंजिनिअर्सना रस्त्यावर चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या (Pune Porsche Car Accident )आजोबाने 2009 मध्ये भावासोबत मालमत्तेच्या वादात डॉन छोटा राजनची मदत घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तत्कालीन नगरसेवक अजय भोसले (Ajay Bhosale) यांच्या हत्येची सुपारी डॉन छोटा राजनला भावंडांमधील वाद मिटवण्यासाठी देण्यात आल्याचे समोर आलं आहे. सुरेंद्र कुमार अग्रवालने डॉन छोटा राजनला तत्कालीन नगरसेवक अजय भोसले यांची 2009 मध्ये हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती. 


मैत्रीच्या संबंधातून अनिल भोसलेंवर गोळीबार


11 नोव्हेंबर 2009 रोजी सकाळी साडेदहा वाजता तत्कालीन नगरसेवक अजय भोसले निवडणूक प्रचारासाठी जात असताना कोरेगाव पार्क येथे त्यांच्या कारवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. याच अनिल भोसलेंशी एबीपी माझाने संवाद साधला. सध्या अनिल भोसले शिंदेंच्या शिवसेनेत सहसंपर्कप्रमुख आहेत. अनिल भोसले यांनी सांगितले की, 2009 मध्ये वडगावशेरीमधून आमदारकीसाठी उभे होतो. राम अग्रवाल यांच्याशी माझे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यावेळी छोटा राजनचे अनेक फोन दोन भावांच्या भांडणातून माझ्याकडे येत होते. हजारो कोटींचा हा वाद होता. राम अग्रवाल एसके अग्रवालला पैसे देत नव्हता. एसके अग्रवालने छोटा राजनला राम अग्रवाल हा अनिल भोसले खास मित्र असल्याचे सांगितले होते. त्यातून माझी सुपारी देण्यात आली गोळीबार करण्यात आला. माझ्यावर जर्मनी बेकरीजवळ माझ्यावर गोळीबार झाला. 


अजूनपर्यंत त्यांना कोणीच अटक केली नाही


आरोपी एक वर्षांनी पकडले गेल्यानंतर सुपारीचा उलघडा झाल्याचे अनिल भोसले यांनी सांगितले. छोटा राजनशी निगडीत केसेस सीबीआयकडे त्याठिकाणी आमच्या साक्ष नोंदवली गेल्याचे ते म्हणाले. त्याठिकाणी सुरेंद्रकुमारला अटक व्हायला हवी होती, पण अजूनपर्यंत त्यांना कोणीच अटक केली नाही. पोलिसांकडे मोठी अफरातफर करून प्रकरण दाबायचे हा त्यांचा धंदा असल्याचे ते म्हणाले. गोळीबार प्रकरणात छोटा राजनसह गोळी चालवणाऱ्या यूपीतील साकेतवर गुन्हा दाखल असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात सुरेंद्रकुमारसह 8 आरोपी आहेत. सुरेंद्रकुमारला आयपी वागणूक दिली जाते.


केसेस पुढे नेण्यासाठी प्रयत्न केल्याने धमकी


अटक न झाल्याने रिट याचिका दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, अजूनही अटक झालेली नाही. पोलिस आणि सीबीआयला माहीत असूनही अटक झाली नसल्याचे ते म्हणाले. अख्खी फॅमिली क्रिमिनल असल्याचे ते म्हणाले. प्रत्येकावर गुन्हे दाखल असल्याचेही अनिल भोसले म्हणाले. गंभीर गुन्हेही दाखल असल्याचे त्यांनी सांगितले. केसेस पुढे नेण्यासाठी प्रयत्न केल्याने धमकी आल्याचे त्यांनी सांगितले. राम अग्रवालने स्वत:च्या सुनेला हात घातला, अशी एक तक्रार सुरेंद्रकुमारने सुनेला हाताशी धरून दिली होती. त्यानंतर राम अग्रवाल फॅमिलीसह पसार झाला होता. 15 ते 20 फरार होऊन अटकपूर्व जामीन घेतला होता. त्यानंतर या दोन्ही भावांमधील दुश्मनी वाढत गेली. त्यांना कशाचीही भीती नसल्याचे ते म्हणाले. 


दरम्यान, पुण्यातील कल्याणीनगर येथे रविवारी झालेल्या अपघातानंतर अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी नातवाला न्यायालयात जामीन घेताना हमी दिली होती. आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालचे अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आल्याने या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या