Pune Porsche Accident: पुणे : पुण्यातील (Pune News) पोर्शे अपघात (Porsche Accident) प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. बेदरकारपणे आपल्या बापाच्या महागड्या कारनं दोघांना चिरडणारा धनिकपुत्र आणि अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी संपूर्ण प्रशासन कामाला लागल्याचं धक्कादायक वास्तवही या प्रकरणात समोर आलं आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या वडिलांना आणि आजोबांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यासोबतच, अल्पवयीन मुलाला दारू दिल्याप्रकरणी बारचालकांनाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात दररोज नवनवे धक्कादायक खुलासे होत असतात. या सगळ्यात आता घटनास्थळी उपस्थित असलेले प्रत्यक्षदर्शीही पुढे येऊ लागले आहेत. आत्तापर्यंत या प्रकरणातील दोन प्रत्यक्षदर्शींनी संपूर्ण घटनाक्रम सांगितलं आहे. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अपघाताचा प्रत्यक्षदर्शी आता समोर आला असून त्यानं माध्यमांसमोर संपूर्ण घटनाक्रम कथन केलं आहे. ज्या ठिकाणी अपघात झाला, तिथपासून केवळ 10 फूट अंतरावर रस्ता ओलांडत असताना ही घटना घडल्याचं पाहायला मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. प्रत्यक्षदर्शीनं सांगितल्यानुसार, अल्पवयीन मुलगा सातत्यानं जोरजोरात ओरडत होता, तुला पाहिजे तेवढे पैसे घे, मला मारू नकोस, तुला पाहिजे तेवढे पैसे मी देईन आणि आत्ताच देतो.


अपघातस्थळावरील जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी अमीन शेखही दिसत आहे. फुटेजमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळतंय की, ते रस्ता ओलांडत होते आणि काही क्षणातच एक पोर्शे कार त्याच्या मागून गेली. त्यानंतर अनिशच्या दुचाकीला धडकली. या धडकेनं इंजिनिअर तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला. यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या जमावानं कारमध्ये उपस्थित असलेल्या मुलाला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. 


धनिकपुत्रच चालवत होता पोर्शे : प्रत्यक्षदर्शींचा दावा 


आणखी एका प्रत्यक्षदर्शीनं माध्यमांना अपघताचा आँखो देखा हाल सांगितला. प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, अल्पवयीन आरोपीच गाडी चालवत होता. त्यानं सांगितलं की, अपघातावेळी पोर्शे कार भरधाव वेगात आली आणि तिनं दुचाकीला धडक दिली. कोणालाही काही कळण्यापूर्वीच अगदी क्षणार्धातच धनिकपुत्रानं दोघांना आपल्या महागड्या पोर्शेनं चिरडलं होतं. यातील तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. माझ्यासमोरच मुलगी तब्बल 15 फुटांपर्यंत उडाली आणि खाली आदळली. तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, आरोपीला घटनास्थळावरुन पळून जाण्याची संधीच मिळाली नाही. कारण कारचे सर्वच एअरबॅग्स ओपन झाले होते. कारमध्ये अल्पवयीन मुलाव्यतिरिक्त इतर दोने ते तीन व्यक्ती होत्या. एअरबॅग्स ओपन झाल्यामुळे गाडीतील सर्वचजम बाहेर आले होते. त्यानंतर तिथे असलेल्या जमावानं आरोपीला धरलं आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. मी आरोपीला पकडून ठेवलेलं आणि जसे पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मी त्याला पोलिसांकडे सोपवलं. 


बड्या बापाचा लाडावलेला सुपुत्राला वाचवण्यासाठी अख्खं प्रशासन सरसावलं 


पुण्यातील अपघात प्रकरणात दोन इंजिनिअर्सचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपी एका मोठ्या बिल्डरचा मुलगा असल्याची बाब समोर आली. 19 मे रोजी घडलेल्या घटनेत तेव्हापासून आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झाले. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या अपघाताच्या 14 तासांनी अल्पवयीन आरोपीला कोर्टातून काही अटींसह जामीन मिळाला. न्यायालयानं त्यांना 15 दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्याचे निर्देश दिले होते आणि रस्ते अपघातांचे परिणाम आणि उपाय यावर 300 शब्दांचा निबंध लिहिला होता. मात्र, सोशल मीडिया आणि मीडियावर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले. दरम्यान, आरोपी बारमध्ये बसून दारू पितानाचा व्हिडिओही व्हायरल झाला. यानंतर तपासात आरोपी दारूच्या नशेत असून सुसाट वेगानं कार चालवत असल्याचंही समोर आलं. त्यानंतर पुणे पोलिसांनी आरोपीला नव्यानं कोर्टासमोर हजर केलं आणि आरोपीचा जामीन रद्द करत त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Pune Porsche Accident: विशाल अग्रवालची महागडी गाडीच लाडोबाचा 'कार'नामा करणार उघड; पोर्शेच्या टीमकडून कारची पाहणी पूर्ण, काय लागलं हाती?