Pune Politicis News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेक नेते बैठका, सभा, दौरे, यात्रा करताना दिसत आहेत. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्यावतीने शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येत आहे. यादरम्यान आज शिंदेंच्या (Shivsena) शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार शरद सोनवणेंनी (Sharad Sonawane) आज शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची (Jayant Patil) भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वादही घेतला. शिवस्वराज्य यात्रेची आज सुरुवात झाली आहे. जुन्नरमधील सभेनंतर जयंत पाटील हे दुपारच्या भोजनासाठी जय हिंद महाविद्यालयात थांबले होते. तिथं सोनवणेंनी हजेरी लावत जयंत पाटील (Jayant Patil), माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) तसेच खासदार अमोल कोल्हेंसोबत (Amol Kolhe) जेवणाचा आस्वाद घेतला. 


या भेटीनंतर आणि स्नेहभोजनानंतर शरद सोनवणे (Sharad Sonawane) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही चर्चा केली आहे का, अशी चर्चा देखील आता रंगू लागली आहे. गेल्याच महिन्यात अजित पवार (Ajit Pawar) गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी थेट शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली होती. त्यानंतर आता सोनवणेंनी तुतारी फुंकण्याची तयारी दर्शवल्याचं बोललं जात आहे. अशातच ते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत जाणार का अशा चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या भेटीवेळी आणि स्नेहभोजनावेळी काय चर्चा झाली याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. 


या भेटीनंतर शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार शरद सोनवणेंनी (Sharad Sonawane) काय चर्चा झाली त्याबाबत एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, जयंत पाटील यांचे आणि माझे प्रेमाचे नाते आहे. त्यात जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमस्थळी आम्ही एकत्र आलो, त्यांनी मला बोलावलं म्हणून मी जेवायला आलो. आजच्या भेटीमागे राजकीय अर्थ काढू नये असं देखील सोनवणे यावेळी म्हणालेत. गेल्याच महिन्यात अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी थेट शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली होती. त्यामुळं महायुतीकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचं नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेला आजपासून सुरुवात


आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी दौरे, बैठका, संवाद सुरु केले आहेत. दरम्यान, एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची राज्यभरात जनसन्मान यात्रा सुरु आहे. या यात्रेच्या माध्यमातून ते नागरिकांशी संवाद साधत आहेत. सरकारच्या योजना जनतेला सांगत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही शिवस्वराज्य यात्रेला आजपासून सुरूवात केली आहे. आज राज्यात पुन्हा रयतेचे राज्य आणण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे. ही यात्रा आज (शुक्रवारी) शिवनेरी किल्ल्यावरून सुरू झाली आहे. 


 


महत्वाच्या बातम्या:  मोठी बातमी! शिंदे गटाच्या नेत्याचं जयंत पाटलांसोबत जेवण आणि चर्चा, शरद पवार गटात प्रवेश होणार? 


...अन् जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे क्रेनमधून पडताना थोडक्यात बचावले, शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्या दिवशी नेमकं काय घडलं?