पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) राष्ट्रवादीचा युवा मिशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं.  आपल्याला विकासावर लक्ष द्यायचं आहे.  (NCP)लाथ मारेल तिथं पाणी काढण्याची धमक ज्यांच्यात असते तो खरा युवक असतो. आज जग बदलत आहे, आपल्याला हा आमूलाग्र बदल स्वीकारायला लागणार आहे, असा सल्ला अजित पवार यांनी यावेळी तरुणांना दिला. त्यासोबतच अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं स्वप्न आहे असं म्हणाऱ्यांचे अजित पवारांनी कान टोचले. जरा कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री मुख्यमंत्री करू नका. आधी संघटन बांधू, ते मजबूत करू, असंही ते म्हणाले.


त्यासोबतच त्यांनी तरुणांना अनेक सल्लेदेखील दिले आहे. युवा कार्यकर्ता कसा असावा?, त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे?, यासंदर्भात त्यांनी युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. ते म्हणाले की, युवकांचे हे वय महत्वाचे असते. लाथ मारेल तिथं पाणी काढण्याची धमक ज्यांच्यात असते तो खरा युवक असतो. आज जग बदलत आहे, आपल्याला हा आमूलाग्र बदल स्वीकारायला लागणार आहे.


चुकीचे आरोप करणाऱ्यांना उत्तरं द्या!


सोशल मीडियाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालंय. त्यामुळं आपल्याला खूप जागरूक राहावं लागणार आहे. विनाकारण आपल्याला कोणी टार्गेट करत असेल तर त्याचं खंडन तातडीनं करा. कोना वरिष्ठांच्या निरोपाची वाट पाहू नका. फक्त उत्तर देताना कोणाच्या भावना दुखावणार नाही, त्यातून वादंग निर्माण होणार नाही. सहिष्णुतेच्या माध्यमाने आपण उत्तर देऊ शकतो. चुकीचे आरोप करणाऱ्यांना उत्तरं द्या, असं अनेक सल्लेदेखील त्यांनी तरुणांना दिले.


50-52 आमदारांच्या मनात खदखद होती...


पुढे बोलताना ते म्हणाले की, आता एकटे अजित पवार अथवा आम्ही सगळ्यांनीच फक्त काम करून चालणार नाही. तुम्हा सर्वांना शेवटच्या टोकापर्यंत काम करावं लागेल.  आज आपल्याला 50 ते 52 आमदार पाठिंबा देतात, म्हणजे त्यांच्या मनात ही खदखद होती. ते बोलून ही दाखवत होते, मात्र वरिष्ठ त्याला दाद देत नव्हते. म्हणून आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला. कोणाचा अपमान, अवमान करण्याचा कोणताही हेतू त्यामागे नव्हता.


आपली बदनामी होता कामा नये; अजित पवार


गटा तटाचे राजकारण करू नका. प्रत्येकाला प्रत्येकाची विचार पटतील असं होत नाहीच. मात्र बहुमत जाणून घ्या, सर्वांच्या मतांचा विचार करूनच पुढं जायचं असतं. यालाच लोकशाही म्हणतात. महायुती सरकार नवं युवा धोरण आणणार आहे. या धोरणात नेमकं काय असावं याबाबत तुम्ही काही बाबी सुचवा. तुमच्या ही मतांचा आदर केला जाईल. पूर्वजांचा वारसा आणि  विचार जपायचा आहे. आपली बदनामी होता कामा नये, याची नोंद घ्यावी, असंही म्हणत तरुणांना खडसावलं आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Yogi Adityanath Alandi : महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी; शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला मारलं त्यानंतर...; योगी आदित्यनाथ