पुणे : पुण्यात ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसवण्याचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या अभिनेता पुष्कर श्रोत्री आणि शरद पोक्षेंना डेक्कन पोलिसांनी समज दिली आहे.

गडकरींचा पुतळा बसवेपर्यंत पुण्यात प्रयोग नाही : पुष्कर श्रोत्री


पुणे महापालिका आयुक्तांच्या परवानगीशिवाय कार्यक्रम करता येणार नाही, असं डेक्कन पोलिसांनी पुष्कर श्रोत्री आणि शरद पोंक्षे यांना सांगितलं.

नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा संभाजी ब्रिगेडने हटवला!


दरम्यान, 3 जानेवारी रोजी पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश  गडकरींचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या चार कार्यकर्त्यांनी हटवून नदीत फेकला होता.

गडकरींचा पुतळा हटवणारे सीसीटीव्हीत कैद


त्यानंतर गडकरींचा पुतळा पुन्हा उद्यानात बसवण्यासाठी पुष्कर श्रोत्री आणि शरद पोंक्षेंनी कलाकारांना 31 जानेवारी रोजी संभाजी उद्यानात एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं.

संभाजी उद्यानातून हटवलेल्या गडकरींच्या पुतळ्याचा भाग नदीत सापडला


इतकंच नाही तर गडकरींचा पुतळा सन्मानाने पुन्हा बसवत नाही, तोपर्यंतब पुण्यात नाटकाचे प्रयोग करणार नाही, अशी भूमिकाही पुष्करने घेतली होती.