Pune Porsche Car Accident : दोन सॉफ्टवेअर अभियंत्यांना आलिशान पोर्शे कारखाली अल्पवयीन नातवाने दारूच्या नशेत चिरडल्यानंतर  (Pune Porsche Car Accident ) आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालने (Surendra Kumar Agarwal) गुन्ह्यातील पुराव्याशी छेडछाड केल्याच्या आरोप ठेवत पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सुरेद्र कुमारचा मुलगा विशाल अग्रवालला न्यायालयीन कोठडी मिळाली असून 14 दिवसांसाठी येरवडा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. विशालच्या अल्पवयीन मुलाची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. त्यामुळे अग्रवाल कुटुंबाच्या तीन पिढ्या पोलिसांच्या कचाट्यात सापडल्या आहेत. 


सुरेंद्र कुमार अग्रवालने ड्रायव्हरला दोन दिवस डांबल्याचा आरोप


दरम्यान, सुरेंद्र अग्रवालवर बिल्डर मुलगा विशाल अग्रवालला पळून जाण्यात मदत केल्याचा आणि नातवाने केलेल्या अपघाताची जबाबदारी स्वीकारण्यासाठी चालकावर दबाव आणल्याचा आरोप आहे.पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी  दिलेल्या माहितीनुसार नातवाला बाजूला करून ड्रायव्हर गंगाराम पुजारीला गुन्ह्याची जबाबदारी घेण्यासाठी सुरेंद्र कुमार अग्रवालने दोन दिवस डांबल्याचा आरोप आहे. ते पुढे म्हणाले की अपघातानंतर लगेचच, चालक बदलण्याचा प्रयत्न केला गेला, जेणेकरून नातू अडचणीत येऊ नये. 


वाचा : घरातील सुनेला हात घातल्याची केस झाली अन् दोन भाऊ अधिकच सुडाला पेटले; पुण्यातील नेत्याने अग्रवाल फॅमिलीची कुंडलीच मांडली


ते म्हणाले होते की, हे खरं आहे की सुरुवातीला ड्रायव्हरने सांगितले होते की तो कार चालवत होता. आम्ही तपास करत आहोत आणि ड्रायव्हरने कोणाच्या दबावाखाली हे वक्तव्य केले याचाही आम्ही तपास करत आहोत. त्या काळात चालक बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. आम्ही याचीही चौकशी करत आहोत, असे कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. यानंतर आता सुरेंद्र कुमारला अटक करण्यात आली आहे. 17 वर्षांच्या मुलाने लक्झरी कार चालवल्याचे दाखवणारे व्हिडिओ पुरावे असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. 


सुरेंद्र अग्रवालकडून गुन्ह्यांची मालिका 


सुरेंद्र अग्रवालवरकेंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यात दावा केला आहे की त्यांनी 2009 मध्ये शिवसेना नगरसेवक अजय भोसले यांची हत्या करण्यासाठी छोटा राजनला सुपारी दिली होती. त्यामुळे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसोबतचे त्याचे संबंधही चव्हाट्यावर आले आहेत. 


सख्ख्या भावाला अडकवण्यासाठी भावाच्याच सुनेचा वापर


दरम्यान, पुण्यातील माजी नगरसेवक अजय भोसले यांचे राम अग्रवाल (सुरेंद्र अग्रवालचा भाऊ) यांच्याशी संबंध होते. राम आणि सुरेंद्र अग्रवाल यांच्यामध्ये पैशावरून वाद सुरु होता. काही हजार कोटींमध्ये हा वाद होता. याच वादात राम कुमार अग्रवालने स्वत:च्या सुनेला हात घातल्याची तक्रार सुरेंद्र कुमार अग्रवालने पुण्यातील पोलिस ठाण्यामध्ये दिली होती. 


सुनेच्या मदतीनेच सुरेंद्र कुमारने राम अग्रवालविरोधात केस केली होती. त्यामुळे या प्रकरणात राम कुमार कुटुंबासह 15 ते 20 दिवस फरार झाला होता. अटकपूर्व जामीन घेतल्यानंतर राम कुमार पुण्यात परतला होता, असे अनिल भोसले यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले होते. या प्रकरणानंतर दोघा भावांमधील दुश्मनी आणखी वाढत गेल्याचे त्यांनी सांगितले होते. पैसा असल्याने सगळे विकत घेऊ शकतो, असं त्यांना वाटते. कायदा आणि सुव्यवस्थेची त्यांना अजिबात भीती नसल्याचे ते म्हणाले. ते कोणत्याही खात्यात गेल्यास त्यांना व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जाते, असेही अनिल भोसले यांनी सांगितले होते. 


अग्रवाल कुटुंब ब्रह्मा ग्रुपचे मालक 


अग्रवाल कुटुंब ब्रह्मा ग्रुपचे मालक आहेत. ब्रह्मदत्त अग्रवाल यांनी स्थापन केलेली रिअल इस्टेट आणि बांधकाम कंपनी आहे. कल्याणीनगरमध्ये हा अपघात झाला होता. विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही, तो पोर्श कार ताशी 200 किमी वेगाने चालवत होता. त्या कारची नोंदणी क्रमांक प्लेट सुद्धा नव्हती. वेगवान कारने पल्सरला मागून धडक दिल्याने अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा यांचा  जागीच मृत्यू झाला होता. अनिश आणि अश्विनी हे मध्य प्रदेशातील अनुक्रमे उमरिया आणि जबलपूर जिल्ह्यातील आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या