'लालबागच्या राजा'नंतर पुण्याच्या 'दगडूशेठ गणपती'लाही गंडा
एबीपी माझा वेब टीम | 11 Sep 2017 06:08 PM (IST)
गणेशोत्सवाच्या 12 दिवसांमध्ये जवळपास साडेतीन कोटींचं रोख दान भाविकांकडून जमा करण्यात आलं आहे. परंतु इथंही काही भाविकांनी आपल्या जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा खपवल्या.
पुणे : 'देते है भगवान को धोखा, इन्सान को क्या छोडेंगे' या गाण्यातील ओळींचा प्रत्यय गणेशोत्सवाच्या काळात पुन्हा एकदा आला आहे. 'लालबागच्या राजा' पाठोपाठ पुण्यातल्या प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीलाही भक्तांनी जुन्या नोटा देऊन 'गंडवलं' आहे. गणेशोत्सवाच्या 12 दिवसांमध्ये जवळपास साडेतीन कोटींचं रोख दान भाविकांकडून जमा करण्यात आलं आहे. परंतु इथंही काही भाविकांनी आपल्या जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा खपवल्या. नोटाबंदी होऊन येत्या नोव्हेंबरमध्ये वर्ष पूर्ण होत आहे. मात्र अजूनही लोकांकडे पाचशे-हजाराच्या नोटा असल्याचं उघड झालं आहे.