पुणे : तुम्ही जर पुण्यात जोरजोरात आवाज करणाऱ्या बुलेट (bullet) चालवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पुणे पोलिसांनी गुन्हेगारांची परेड काढल्यानंतर आता वाहतूक पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी हौशी बुलेटराजांवर (Traffic Police) धडाधड कारवाई करायला सुरुवात केली आहे. बुलेट किंवा दुचाकींना लावण्यात येणारे मोठे आवाज करणारे सायलेंसरवर पुणे वाहतूक पोलीस कारवाई करताना दिसत आहे. पुण्यातील विविध चौकांमध्ये ही कारवाई करण्यात येत आहे. प्रत्येक बुलेट राजाकडून 1000 रुपये दंड वसूल करण्यात येत असून त्यांच्या गाडीचं सायलेंसरदेखील वाहतूक पोलिसांकडून जप्त करण्यात येत आहे.
पुण्यात गाड्यांच्या बाबतीत हौशी कलाकारांची काही कमतरता नाही. याच हौशी गाडी चालकांवर आता पुण्यातील वाहतूक विभागातील पोलिसांची करडी नजर असणार आहे. पुण्यातील विविध परिसरात आता हौशी बुलेट चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. पुण्यातील विविध परिसरातील नागरिकांनी या संदर्भात तक्रारी दिल्याची माहिती आहे. शिवाय या सायलेंसरमुळे ध्वनी प्रदुषण निर्माण होते. त्यामुळे आता या सगळ्यांवर कारवाई करण्यात येत असून त्यांचं सायलेंसर जप्त करण्यात येत आहे. एका दिवसांत पुणे वाहतूक पोलिसांनी साधारण 200 सायलेंसर जप्त केले आहेत.
दादा, भाई, लव्ह लिहिलेल्या सायलेंसरवर कारवाई
मोठा आवाज करणाऱ्या सायलेंसरवर आणि दादा, भाई, लव्ह असे शब्द लिहून परिसरात दहशत पसरवत असलेल्या सायलेंसरच्या चालकावरदेखील कारवाई करण्यात येणार असल्याचं वाहतूक विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे बुलेट चालवून शहरात हवा करणं महागात पडणार आहे. त्यामुळे ज्यांच्या गाडीला अशा प्रकराचे आवाज करणारे सायलेंसर असतील तर त्यांनी साधे सायलेंसर बसवून घ्यावेत, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
बुलेट मॉडिफाय करणं भोवणार?
बुलेटला वेगळा सायलेन्सर बसवतात. त्यामुळे शहरातील अनेक भागात ध्वनी प्रदूषण होतं. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ध्वनी प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासोबतच वायु प्रदूषणाचा प्रश्नदेखील कायम आ वासून उभा असतो. त्यामुळे दोन्ही शहरात अनेकदा या प्रकारची कारवाई करण्यात आली होती. अनेक वेळा वेगवेगळे प्रश्न आणि समस्या निर्माण करताना हे तरुण कायम दिसतात. यावरुन यंदा पोलिसांनी अतिहौशी तरुणांना चांगलाच धडा शिकवण्याचं ठरवलं आहे.रणाऱ्या तरुणांना चांगलाच चाप मिळणार आहे.
इतर महत्वाची बातमी-
Pune Crime News : पुण्यातील भाईंना भरली खाकीची धडकी; रिल्स डिलीट करायला सुरुवात