पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) वसतिगृहात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत डाॅ. महेश रघुनाथ दवंगे यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तक्रारीवरुन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहाच्या भींतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह लिखाण करण्यात आलं आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या बाहेर भाजप आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहे. या सगळ्यांसंदर्भात गुन्हा दाखल करावा, अशी भूमिका आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीन करण्यात येत होती. त्यामुळे डाॅ. महेश रघुनाथ दवंगे यांनी थेट पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


शिक्षणांचं माहेरघर असलेल्या पुण्यात आणि ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात हा प्रकार घडला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 8 नंबरच्या वसतीगृहातील पार्कींगमध्ये काळ्या रंगाने आक्षेपार्ह लिखाण करण्यात आलं आहे. काल रात्री उशीरा ही माहिती समोर आली. त्यानंतर विद्यापीठातील वसतीगृहातील संपूर्ण परिसर मोकळा केला आहे. या ठिकाणी कोणालाही जाण्यास आता विद्यापीठ प्रशासनाकडून बंदी करण्यात आली आहे. 


सीसीटीव्ही तापसणी सुरु...


या प्रकरणी आता चौकशी सुरु आहे.  हा प्रकार कोणी केला आणि कोणत्या हेतूने केला आहे. याची माहिती घेतली जात आहे. शिवाय 6 नंबरच्या वसतीगृह परिसरतील आणि भीतींजवळील सगळे सीसीटीव्ही तपासने जात आहे. हा प्रकार कोणी केला?, याची माहिती घेतली जात आहे. 


पोलिसांची टीम विद्यापीठात दाखल...


भाजपने आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर आता पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांची एक टीम तयार केली आहे. ही टीम आता विद्यापीठ परिसरात दाखलदेखील झाली आहे.  भाजपकडून हा प्रकार केलेल्याला शिक्षा करण्यात यावी आणि त्यांच्यावर क़क कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सातत्त्याने केली जात आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.  पुण्यातील विद्यापीठात विविध ठिकाणाहून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात.  त्यात पुण्यात अनेक विद्यार्थी विविध मागण्यांसाठी आंदोलनं करत असतात. त्यात आता मोदीविरोधात आक्षेपार्ह लिखाण कोणी केलं आणि का केलं असावं? याचा शोध घेणं सुरु आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Pune SFI ABVP : पुणे विद्यापीठात राडा; एसएफआय-अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, काही कार्यकर्ते जखमी