Bhimthadi Jatra  : शहरी आणि ग्रामीण संस्कृतीचा मिलाप (pune) आता पुणेकांना (Bhimthadi Jatra) अनुभवायला मिळणार आहे. कृषी महाविद्यालयाच्या विस्तीर्ण पटांगणावर भरत असलेल्या भीमथडी जत्रा या बहुप्रतिक्षित वार्षिक सांस्कृतिक व कृषी महोत्सवाची सुरुवात झाली असून हा सोहळा25 डिसेंबर पर्यंत अनुभवता येणार आहे. या जत्रेत पुणेकरांना ग्रामीण संस्कृती अनुभवता येणार आहे. तसंच खाद्यसंस्कृती अनुभवता येणार आहे. 


भीमथडी जत्रेसंदर्भात बोलताना सुनंदा पवार म्हणाल्या, “भीमथडी जत्रेमध्ये आपल्या श्रीमंत वारशाचे प्रतिबिंब दिसते, ज्याचा पडसाद आपल्या समुदायांच्या उत्साहाने सळसळणाऱ्या उर्मीमध्ये ऐकू येतो. हा उपक्रम म्हणजे केवळ एक उत्सव नाही तर काळाच्या कसोटीवर टिकून राहण्याची आपली क्षमता व पिढ्यानपिढ्यांपासून टिकून राहिलेल्या परंपरा अशा आपल्याला आपली ओळख मिळवून देणाऱ्या गोष्टींचे ते एक जिवंत उदाहरण आहे. भीमथडी जत्रा म्हणजे आपल्या कुशल कारागिरांच्या हातांनी विणलेल्या कहाण्यांचा एक असा गालिचा आहे, ज्यातून आपल्या स्व-मदत गटांच्या अदम्य उर्मीचे प्रदर्शन घडते. 


महिला सक्षमीकरणावर भर


भीमथडी जत्रेमध्ये महिलांच्या स्व-मदत गटांना त्यांच्या प्रतिभेचे आणि उद्योजकता कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठीचा मंच उपलब्ध करून दिला जातो ही या उपक्रमासाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे. या जत्रेमध्ये हे गट घरगुती बनावटीच्या वस्तूंची विक्री करतील, ज्यातून जत्रेला भेट देणाऱ्यांना खरेदीचा आगळावेगळा अनुभव मिळेलच पण त्याचबरोबर स्थानिक कारागिर आणि महिला कारागिरांनाही आर्थिक आधारही मिळतो.


ग्रामीण आणि शहरी संस्कृती


दरवर्षी डिसेंबरमध्ये भीमथडी जत्रा भरवली जाते. यात ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचं दर्शन होतं. विविध पारंपारिक खेळ, खवय्यांसाठी वेगवेगळ्या पदार्थ्यांची रेलचेल बघायला मिळते. शिवाय रोज संध्याकाळी विविध कार्यक्रमाचं आयोजनही केलं जातं. खान्देशातील मांडे हा भीमथडी जत्रेतील महत्त्वाचा पदार्थ आहे. वर्षभर पुणेकर खास मांडे खाण्यासाठी भीमथडी जत्रेची वाट बघत असतात. त्यासोबतच विविध पदार्थांची रेलचेलदेखील बघायला मिळते. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पदर्थांची चव भिमथडीत चाखायला मिळणार आहे.स 



पारंपारिक खेळांची रेलचेल



बैलगाडी, पारंपारिक पदार्थ, पारंपारिक खेळ त्यासोबतच टाकाऊतून टिकाऊ, महाराष्ट्राची कला संस्कृती, पर्यावरण संवर्धन, एकात्मिक शेती, मत्स्यशेती या विषयांवरील विविध दालने या भीमथडी जत्रेत आहेत. 25 डिसेंबर या जत्रेचा शेवटचा दिवस असणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-


D. Y. Patil College : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा MBA परीक्षेचा पेपर फुटला; विद्यापीठाकडून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय