पुणे:  पुण्यातील नवले पूल परिसरात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अपघातानंतर त्या ठिकाणी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.  या विशेष मोहीमेच्या अंतर्गत ठिकाणी वाहन चालकाकडून 24 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 15 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. नवलेपूल परिसरात झालेल्या भीषण अपघातानंतर वाहतूक सुरक्षेची स्थिती सुधारण्यासाठी पुणे आरटीओ (Pune RTO) कडून खेड शिवापुर टोल नाका ते नवले पुलदरम्यान विशेष मोहीम राबवून कारवाई केली जाते. गेल्या 15 दिवसात या पथकाकडून 824 वाहन चालकांवर विविध नियम भंगाबाबत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.(Pune News)

Continues below advertisement

या कारवाईत 24 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.आरटीओकडून विनाहेल्मेट, सीट बेल्ट, विमा, वाहनातील तांत्रिक बिघाड, वेग मर्यादेचे उल्लंघन आणि मोबाईल वापर यासारख्या गंभीर गोष्टींवर लक्ष केंद्रित करून तपासणी केली जात आहे, नवले पूल परिसरात काही दिवसांपूर्वी भीषण अपघात होऊन आठ जणांचा मृत्यू झाला होता, यात वाहनाचा वेग ज्यादा असल्याचे दिसले होते तसेच अनेक वाहन चालकाकडून नियमांचे पालन केले जात नव्हते त्यामुळे आरटीओकडून दोन पथकांमार्फत वाहनांची तपासणी करून कारवाई करण्यात येते.

यामध्ये चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणे ११३, वाहनांचा विमा संपलेले ९५, वाहनांची योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण न केलेले ८९, हेल्मेटचा वापर न करणारे ८५, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणारे ४७, ब्रिक लाईट झालेली ४७,सीट बेल्टचा वापर न करणारे २६, अशा ८०० हून अधिक वाहनचालकावर कारवाई करण्यात आली आहे. नियमाचे पालन न करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. यापुढे देखील ही कारवाई सुरू राहणार असल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले आहे.

Continues below advertisement

या मोहिमेमुळे नवले पूल परिसरातील वाहतूक शिस्त किती ढासळलेली होती, याचेही स्पष्ट चित्र समोर आले आहे. सततच्या अपघातांनंतर नागरिकांकडूनही कठोर कारवाईची मागणी होत होती. त्यामुळे आरटीओकडील पथकांनी तपासणी अधिक काटेकोर केली असून, परिसरात पाहणी आणि कारवाई सुरू केली आहे.