Pune municipal corporation elections 2022: महानगरपालिका (Pune municipal corporation) निवडणुका तोंडावर आहे आणि त्यातच शिंदे सरकारने प्रभाग रचनेचा निर्णय बदलून महाविकास आघाडीच्या सरकारला पुन्हा एकदा धक्का दिला आहे. येत्या निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग रचना तयार करण्यात आली होती. ती प्रभाग रचना बदलून चार सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला आहे. त्या विरोधात पुण्यातील राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस न्यायालयात धाव घेत याचिका दाखल करणार आहे.
80 टक्के निवडणूक प्रक्रिया पुर्ण झाली आहे. तीन सदस्यीय रचनाही अंतिम झाली आहे. तरी भाजपने आपल्या फायद्यासाठी आता चार सदस्यीय रचना तयार केली आहे. आगामी निवडणुकीसाठीची सगळं कामे झाली असताना हा निर्णय घेऊन उगाच वेळ घालवला जात आहे, असं मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केलं आहे. सरकारच्या हा निर्णय रद्द करण्यासाठी राष्ट्रवादीकडून न्यायालयात धाव घेतली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीपासूनच आरखडा बदलण्यास विरोध करणार असल्याचं आणि वेळ पडल्यास नयायल्यात जाणार असल्याचं म्हटलं होतं . आरखडा तयार करणं, त्यावर हरकती - सूचना मागवून सुनावणी घेणं आणि मतदारयाद्या प्रसिद्ध करणं ही कामं निवडणूक आयोगाकडून पूर्ण करण्यात आली असून आता फक्त निवडणुकांच्या तारखा जाहीर करणं बाकी आहे . अशावेळी संपूर्ण आराखडा बदलण्याला आपला विरोध राहील असं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलं होतं. त्यानुसार आता राष्ट्रवादी न्यायालयात धाव घेणार आहे.
राज्यात सत्ताबदल होताच आगामी महापालिका निवडणुकांसाठी आधीच्या सरकारच्या काळात तयार करण्यात आलेली तीन सदस्यीय प्रभागरचना बदलण्याची मागणी भाजप नेत्यांकडून होत झाली होती. तर दुसरीकडे प्रभाग रचनेचा आराखडा बदलल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा महाविकास आघाडीकडून देण्यात आला होता. भाजप नेत्यांची मागणी मान्य झाली. त्यामुळं राज्याच्या सत्तेनंतर महापालिकांवर ताबा मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये घामासान पाहायला मिळणार आहे .