Pune Navale Bridge Accident पुणे: पुणे बंगळुरु महामार्गावरील नवले पूल हा अपघाताचा हॉट स्पॉट बनत आहे. पुण्यातील याच नवले ब्रीजवर सायंकाळी झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. साताराहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार अपघातग्रस्त ट्रकचे ब्रेक फेल झाले होते. या अपघातातील मृत आणि जखमींची नावं समोर आली आहेत. तर, दोन्ही ट्रक चालकांची ओळख पटलेली नाही. मृतांची ओळख त्यांच्या नातेवाईकांनी पटवल्यानंतर या नावांचा उल्लेख करण्यात येत आहे.
Pune Navale Bridge Accident : कारमधील प्रवासी मृत
स्वाती संतोष नवलकर, वय 37 वर्ष, यांचा या अपघातात मृत्यू झाला. त्यांची ओळख संतोष नामदेव नवलकर यांनी पटवली. स्वाती नवलकर या संतोष नवलकर यांच्या पत्नी होत्या. ते राहणार विश्वास पॅलेस धायरी फाटा पुणे येथे वास्तव्यास आहेत. शांता दत्तात्रय दाभाडे, वय 54 वर्ष, दत्तात्रय चंद्रकांत दाभाडे वय 58 वर्षे राहणार धायरी फाटा पुणे,ओळख पटवणारे संतोष नवलकर यांच्या त्या सासू आणि सासरे होते.या घटनेत मोक्षिता हेमकुमार रेड्डी वय 03 वर्ष हिचा मृत्यू झाला आहे. तिची ओळख तिच्या वडिलांनी पटवली.
कारचा चालक, धनंजय कुमार कोळी वय 30 वर्ष राहणार सोनवणे वस्ती चिखली पुणे. मुळगाव जयसिंगपूर कोल्हापूर असून महेश दुन्दुप्पा गोणी भाऊजी यांनी ओळख पटवली. सातारा जिल्ह्यातील रोहित ज्ञानेश्वर कदम याचा वयाच्या 25 व्या वर्षी रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ट्रकमधील मरण पावलेल्या दोघांची ओळख पटलेली नाही. असे एकूण 8 मृत्यू आहेत.
पल्स हॉस्पिटल येथील पेशंट ची माहिती 1. सोफिया अमजद सय्यद वय 15 वर्ष, व्यवसाय शिक्षण, राहणार रुपीनगर निगडी पुणे 2. रुकसाना इब्राहिम बुरान वय 45 वर्ष, व्यवसाय गृहिणी 3. बिस्मिल्ला सय्यद वय 38 वर्ष व्यवसाय गृहिणी राहणार खंडोबा माळ चाकण पुणे 4. इस्माईल अब्बास बुरान वय 52 वर्ष व्यवसाय मजुरी राहणार रुपीनगर निगडी पुणे5. अमोल मुळे वय 46 वर्ष राहणार काळेवाडी फाटा मो क्र 6. संतोष सुर्वे वय 45 वर्ष राहणार भूमकर नगर नरे
नवले हॉस्पिटल येथील पेशंट बाबत माहिती 1. सय्यद शालीमा सय्यद 2. जुलेखा अमजद सय्यद, वय 32 वर्ष 3. अमजद सय्यद वय 40 वर्ष . सर्व राहणार भक्ती शक्ती रोड, निगडी पुणे 4. सतीश वाघमारे वय 35 वर्ष, राहणार शिरूर खांदाड नांदेड 5. सोहेल रमनुद्दीन सय्यद, वय 20 वर्ष राहणार निकोडो चाकण पुणे 6. शामराव पोटे वय 79वर्ष राहणार, फ्लॅट नंबर 701 हिंजवडी पुणे
अडवांटेज हॉस्पिटल मार्केट यार्ड 1. अंकित सलियन वय 30 वर्ष राहणार तारा वेस्ट आंबेगाव बुद्रुक, पुणे