Pune Election 2025: पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) मोठा विजय मिळवला आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण 17 महत्त्वाच्या नगरपरिषद आणि नगरपालिका 9 (Pune Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025) जागांवर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. या विजयाची बातमी समजताच पुण्यातील बारामती हॉस्टेल बाहेर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळत जल्लोष केला. आज अजित पवार महानगपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या भेटीगाठी आणि मुलाखती घेत आहेत. विजयानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि इच्छुक उमेदवार अजित पवारांची भेट घेण्यासाठी बारामती हॉस्टेलवर गर्दी करत आहेत. दरम्यान या विजयावरती अजित पवारांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "जिल्हा कोणाच्या मागे आहे बघा", नगर परिषदांच्या निकालानंतर अजित पवार यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे.(Pune Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025)

Continues below advertisement

एका वाक्यातच अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आपला गड राखला आहे. पुणे जिल्ह्यातील 17 नगरपरिषद आणि नगरपालिका पैकी 9 ठिकाणी राष्ट्रवादी विजयी झाली आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पकड मजबूत असल्याचे चित्र दिसून आले आहे. बारामती, इंदापूर आणि लोणावळा यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष निवडून येणे ही अजित पवारांसाठी मोठा विजय मानला जात आहे. दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपनेही काही जागांवर आपले वर्चस्व राखलं आहे.

Pune Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025: एकूण नगरपरिषदा (संख्या) : 14 + 3 पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदा

1 लोणावळा - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 2 तळेगाव - बहुमत राष्ट्रवादीचा मात्र नगराध्यक्ष भाजपचा 3 दौंड- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट4 चाकण - शिवसेना शिंदे गट5 शिरूर- बहुमत भाजपचा आणि नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट6 इंदापूर- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट7 सासवड - भाजप8 जेजुरी - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट9 भोर - बहुमत भाजपला मात्र नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट10आळंदी - भाजप11 जुन्नर - शिवसेना शिंदे12 राजगुरुनगर - शिवसेना शिंदे गट13 बारामती - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट14 फुरसुंगी- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

Continues below advertisement

Pune Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025:  पुणे जिल्ह्यातील नगरपंचायती

1 वडगाव मावळ - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट2 मंचर - शिवसेना शिंदे 3 माळेगाव - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट