PMC Election 2022 Prabhag 33 Mahatma Society-Bavdhan Khurd, पुणे मनपा निवडणूक प्रभाग 33, महात्मा सोसायटी-बावधन खुर्द : पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 33, अर्थात महात्मा सोसायटी-बावधन खुर्द. नव्या प्रभागरचनेनुसार, महात्मा सोसायटी, बावधन खुर्द, आयडीयल कॉलनी, लॅनटना गार्डन, वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, प्रतिकनगर या प्रमुख ठिकाणांचा प्रभागात समावेश होतो.

पुणे महापालिका निवडणूक 2022 साठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीनुसार, पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 33, महात्मा सोसायटी-बावधन खुर्द या प्रभागातील 'ब' भाग हा सर्वसाधारण गटासाठी आरक्षित करण्यात आला आहे.

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 :

अ. हरिदास कृष्णा चरवड (Haridas Krushna Charwad) (भाजप)
ब. हेमा उर्फ राजश्री दिलीप नवले (Hema/Rajashri Dilip Nawale) (भाजप)
क. निता अनंत दांगट (Nita Anant Dangat) (भाजप)
ड. राजू मुरलीधर लायगुडे (Raju Murlidhar Laygude) (भाजप)

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

महात्मा सोसायटी, बावधन खुर्द, आयडीयल कॉलनी, गिरीजाशंकर विहार, चंद्रलोक नगरी, डहाणूकर कॉलनी, वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणांचा समावेश होतो.


प्रभाग क्रमांक 33 : तीन सदस्यीय

मागील निवडणुकीत म्हणजेच, 2017 मध्ये या प्रभागात चार नगरसेवक निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. पुणे महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत पुण्यात 58 प्रभाग असणार आहेत. शहराच्या 2011 च्या जनगणनेनुसार, असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर ही निवडणूक होईल. तीन सदस्यांचे 57 प्रभाग आणि दोन सदस्यांचा एक असे मिळून 58 प्रभाग असणार आहेत. तर नव्या रचनेत एकूण 173 नगरसेवक असतील.  प्रभाग क्रमांक 31 मध्ये तीन सदस्यांचा असणार आहे.

PMC Election 2022 पुणे मनपा निवडणूक प्रभाग  33

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर