मिलिंद एकबोटे स्वतःहून पोलिसात चौकशीसाठी हजर
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 23 Feb 2018 05:00 PM (IST)
चौकशीनंतर अहवाल सुप्रीम कोर्टात सादर करु, अशी माहिती पुण्यातील शिक्रापूर पोलिसांनी दिली.
पुणे : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटे चौकशीसाठी पोलिसात हजर झाले आहेत. पुण्यातील शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये एकबोटेंनी आपणहून चौकशीसाठी हजेरी लावली. चौकशीनंतर अहवाल सुप्रीम कोर्टात सादर करु, अशी माहिती पोलिसांनी दिली. मिलिंद एकबोटेंच्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारची बनवाबनवी सुप्रीम कोर्टात उघड झाली होती. एकबोटेंना आतापर्यंत का अटक केली नाही, या प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने हास्यास्पद उत्तर दिलं. एकबोटे आम्हाला सापडलेच नाहीत, सातत्यानं गायब होते, या सरकारच्या दाव्याचा खुद्द एकबोटेंच्या वकिलांकडून इन्कार करण्यात आला.