Pune Metro :  पुणे मेट्रोप्रवाशांना (Pune Metro) ववर्षांनिमित्त म्हणजेच 1 जानेवारी 2024 पासून नवं गिफ्ट देण्यात येणार आहे आहे. पुणे मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. मेट्रोला मिळणारा प्रतिसाद पाहून या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.  पुणे मेट्रो प्रशासनाने पिक अवर्स आणि नॉन पीक अवर्स अशा दोन्ही वेळेत गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे.


गर्दीच्या वेळेत मेट्रो गाड्या आता दर 7.5 मिनिटांनी स्थानकांवर दाखल होतील, ज्यामुळे शहरातील प्रवासांचा वेळ वाचणार आहे. नॉन-पीक अवर्समध्ये  10 मिनिटांनी मेट्रो धावणार आहेत. मेट्रोच्या या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास सोपा होणार आहे आणि वेळही कमी लागणार आहे. 


कोणत्या मार्गावर किती फेऱ्या वाढवल्या!


वाढत्या मागणीला सामावून घेण्यासाठी पर्पललाइन (पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट) 32 जादा फेऱ्या सुरु होणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची कनेक्टिव्हिटी सुरळीत होणार आहे. त्यासोबतच  अॅक्वालिन (वनाझ ते रुबी हॉल क्लिनिक) 31 फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे कोथरुड ते रुबी हॉल क्लिनिक प्रवास सोपा आणि कमी वेळात होणार आहे. प्रवाशांना मेट्रोची वाट बघावी लागणार नाही आहे. 


स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवणार


पुणे शहरातील स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रस्तावित आहे. या  प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जाईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितलं होतं. स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेल्यानंतर राज्य शासन त्याचा पाठपुरावा करून मंजुरी घेईल. खडकवासला ते खडारी हा 25.65 किमीच्या मेट्रो मार्गाचा डीपीआर राज्य शासनाकडे सादर झालेला आहे. तो देखील मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन केंद्र शासनाकडे पाठवला जाईल. या मेट्रोचे शेवटचे स्टेशन खडकवासला धरणापर्यंत असावे अशी मागणी केलेली आहे. त्याची देखील संयुक्त पाहणी झालेली आहे. तो प्रस्ताव फिजिबिलिटी रिपोर्टसह शासनाकडे सादर केलेला असून राज्य शासन त्यावर निर्णय घेईल, असे मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितलं होतं. आता फक्त या मेट्रोसाठी केंद्राच्या मान्यतेची गरज आहे ती मान्यता मिळाली की मेट्रोचा मार्ग मोकळा असेल. मात्र त्यापूर्वी मेट्रोला मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांनी फेऱ्या वाढवल्या आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुरळीत आणि कमी वेळेत होणार आहे. 






इतर महत्वाची बातमी-


Pune Metro : स्वारगेट ते कात्रज मेट्रो धावणार? केंद्राच्या मान्यतेची प्रतीक्षा; अजित पवार निधी देणार