पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मुक्ता टिळक
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 15 Mar 2017 08:26 AM (IST)
पुणे : पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मुक्ता टिळक यांची निवड झाली आहे. पुणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान झाला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत मुक्ता टिळक यांना 98 मतं मिळाली. राष्ट्रवादीच्या उमेदवार असलेल्या नंदा लोणकर यांचा मुक्ता टिळक यांनी 46 मतांनी पराभव केला. लोणकर यांना मतदानात 52 मतं पडली. शिवसेनेनं मतदानाच्या वेळी तटस्थ भूमिका घेतली. पुण्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर आणि उपमहापौर विराजमान होणं निश्चित होतं. 162 पैकी भाजपचे 98 नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादीला 40, काँग्रेसला 11, शिवसेनेला 10, मनसेला दोन जागा मिळवण्यात यश आलं आहे. पुणे महापालिका पक्षीय बलाबल भाजप - 98 शिवसेना - 10 काँग्रेस - 11 राष्ट्रवादी - 40 मनसे – 2 इतर - 1