पुणे : एरवी निसर्गाचा पर्यावरण जपण्याचा संदेश देणारे फलक आपण कायमच अनेक वाहनांवर बघत असतो. मात्र पुण्यात चक्क हिरव्या गालीचाने नटलेली रिक्षा प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल झालेली आहे.


रस्त्यावरून फिरतानाही तुम्हाला निसर्गाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्हाला एक पाऊलही पुढे टाकायची गरज नाहीय, आता तुम्ही म्हणाल  हे कसं शक्य आहे? पण हो शक्य करून दाखवलंय पुण्यातील एका रिक्षावाल्याने. वाढतं तापमान लक्षात घेता प्रवाशांच्या मनाला आणि शरीराला थंडावा मिळावा यासाठी पुण्यातील इब्राहिम तांबोळी या रिक्षाप्रेमीने ही अनोखी शक्कल लढवली आहे.

VIDEO | सोशल मीडियात हिरवीगार रिक्षा होतेय वायरल | वायरल चेक | एबीपी माझा



तांबोळीनी पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी चक्क आपल्याच रिक्षाचं माध्यम निवडलंय. पुण्यातील वाढतं तापमान लक्षात घेता यावर काहीतरी उपाय शोधणं किती गरजेचं आहे हे तांबोळींच्या लक्षात आलं.  त्यामुळे फार काही नाही तर किमान आपण लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने त्यांनी चक्क आपल्या रिक्षालाच हिरव्या गालीचाने नटवलं आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु असलेलें हे रिक्षाचे काम आठ दिवसांपूर्वी संपले आणि ही रिक्षा पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली आहे.