पुणे : पुणे जिल्ह्यात पुणे, शिरुर, मावळ आणि बारामती चार मतदारसंघासाठी मतमोजणी पार पडत आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. त्यात पुण्यात बारामती हा हॉट मतदार संघ मानला जात आहे. त्यामुळे राज्याचं लक्ष हे बारामती लोकसभा मतदार संघाकडे लागलं आहे. साधारण प्रत्येक फेरीत आघाडी आणि पिछाडी बदलत असताना दिसत आहे. त्यासोबच शिरुर, मावळ आणि पुणे लोकसभा मतदार संघाकडेदेखील अनेकांचं लक्ष लागलं आहे. या तीन मतदार संघापैकी शिरुरकडे लक्ष लागलं आहे. 


यात पुण्यात महायुतीचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात सध्या महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे आघाडीवर आहेत.  बारामतीत महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. तर मावळमध्ये महायुतीचे श्रीरंग बारणे आघाडी आहे. त्यातच महाविकास आघाडी दोन तर महायुती दोन अशा स्थिती सध्या पुणे जिल्ह्यातील चारही मतदार संघात पाहायला मिळत आहे. 


पुणे लोकसभा मतदार संघात  माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात काँग्रेसने कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देऊन चुरस निर्माण केली होती. वंचित बहुजन आघाडीनेही माजी नगरसेवक वसंत मोरे देखील रिंगणात उतरले होते. त्यात आता तिसऱ्या फेरीअखेर भाजपाचे मुरलीधर मोहोळ 12600 मतांनी आघाडीवर आहेत. 


मावळ लोकसभा मतदार संघात महायुतीचे श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे पाटील त्यांच्यात तगडी लढत होती.त्यात आता तिसऱ्या फेरीत श्रीरंग बारणे 92481 मतं आहेत तर संजोग वाघेरे 76968 मत पडले आहेत. यात आतामहावियुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे 15,513 मतांनी आघाडीवर आहेत. 


शिरुर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे आणि महायुतीचे आढळराव पाटील यांच्यात लढत आहे. राज्यातील हॉट मतदार संघ मानला जात आहे. पवार विरुद्ध पवार अशी लढत या मतदार संघात आहे. त्यामुळे अजित पवारांनी या मतदार संघाकडे  जास्त लक्ष घातलं होतं. या मतदार संघात प्रचारादरम्यान थेट टीका करण्यात आली. याच मतदार संघात आत अजित पवार गटाला मोठा धक्का बसताना दिसत आहे. अमोल कोल्हे 25,088 मतांनी आघाडीवर आहे. त्यांनी थेट सेलेब्रेशनलादेखील सुरुवात केली आहे. पेठे वाटाण्यास सुरुवात केली आहे. 


बारामती लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर थेट पवार विरोध पवार अशी लढत होती. नणंद भावजय अशी लढत होती. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकल्या होत्या. या मतदार संघात  सुप्रिया सुळेंची आघाडीवर आहेत. तर सुनेत्रा पवारांना मात्र धक्का बसताना दिसत आहे. 


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! माढ्यातून पहिल्या फेरीत धैर्यशील मोहिते पाटील 5000 मतांनी आघाडीवर, निंबाळकर पिछाडीवर