Pune Weather health Update : राज्यासह पुण्यात वातावरणात बदल(Pune tempreture) जाणवत आहे. ऊन, थंडी आणि पाऊस यामुळे अनेकांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. पुण्यातील अनेक घरांमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळत आहे. त्यामुळे पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. बदलत्या (Cough and cold) वातावरणाचा अनेक नागरिकांना फटका बसत आहे. त्यातही लहान मुलं आणि घरातील ज्येष्ठ नागरिकांना जास्त प्रमाणात त्रास होत आहे. त्यामुळे घरातील लहानग्यांची आणि ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घेण्याचंदेखील आवाहन करण्यात येत आहे.
थंड आणि उन्हाच्या अशा बदलत्या वातावरणात विषाणूजन्य आजारांचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढत असल्याचे समोर आले आहे. लहान मुलांमध्ये बदलत्या वातावरणाचा सामना करण्याची क्षमता कमी असते. त्यातून ही मुले आजारी पडण्याचं प्रमाण जास्त असते. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेणं, गरजेचं आहे. पुणे शहरासह ग्रामीण भागातही मुले आजारी पडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
कोरड्या खोकल्याने पुणेकर बेजार
पुण्यात सध्या वातावरणात सातत्याने बदल होत आहे. याचा परिणाम अनेकांच्या आरोग्यावर होत आहे. अनेकांना ताप, सर्दी आणि खोकल्याच्या समस्या जाणवत आहेत. मात्र खोकला फार काळ टिकत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शिवाय लहान मुलांनाही खोकल्याचा त्रास होत असल्याने पालकही त्रस्त झाले आहे. या सगळ्यांच नीट निरीक्षण करा आणि तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. कोणताही ताप दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ असेल, बाळाला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असेल, तीव्र सर्दी खोकला असेल आणि घरातील इतर लोक आजारी असतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे, असंही डॉक्टरांनी सांगितलं.
गोवर आणि कांजण्यांसोबतच चिकनगुनियाच्या रुग्णात वाढ
या बदलत्या वातावरणामुळे मुलांमध्ये तापाची साथदेखील आहे. त्यासोबतच गोवर आणि कांजण्यांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांत तापाचं प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे मुलांना ताप आल्यास किंवा त्यांच्या प्रकृतीत काही बिघाड जाणवल्यास लवकरच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरु करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यासोबतच गारठा आणि पावसामुळे शहरात डासांचं प्रमाणत झपाट्याने वाढलं आहे. त्यामुळे चिकनगुनियाचे रुग्णदेखील वाढले आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला जाणवल्यास त्वरीत उपचार सुरु करा आणि घरातील इतर सदस्यांना याची लागण होणार नाही, याची काळजी घ्या.