Pune lakshmi Road  : पुणेकरांचे आवडते खरेदी करण्यासाठीचे ठिकाण म्हणजे लक्ष्मी रोड (lakshmi Road). लक्ष्मी रोड परिसरात अनेक कपड्यांची आणि  विविध वस्तूंची दुकाने आहेत. या रस्त्यावर नेहमी रहदारी पाहायला मिळते. पण येत्या शनिवारी  (11 डिसेंबर) हा रस्ता केवळ पादचाऱ्यांसाठी खुला असणार आहे. यासंबंधीत पुण्याचे महापौर (Pune Mayor)  मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी एक ट्वीट केले आहे. 


मुरलीधर मोहोळ यांचं ट्वीट 
11 डिसेंबर रोजी पुण्यात पादचारी दिन साजरा केला जाणार आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी पुण्यातील लक्ष्मी रस्त्या हा केवळ पादचाऱ्यांसाठी खुला ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीटमधून दिली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले, 'पादचारी दिवस साजरा करणारं पुणे शहर देशात पहिलं ठरणार आहे. पुण्यात शनिवारी 'पादचारी दिन' पादचारी नागरिकांना प्रोत्साहन मिळावे, त्याचे महत्त्व समजावे, या उद्देशाने पुणे महापालिकेच्या माध्यमातून शनिवारी (11 डिसेंबर रोजी) पादचारी दिन साजरा करणार आहोत.' शनिवारी वाहतुकीसाठी तसेच पार्किंगसाठी लक्ष्मी रस्ता हा पूर्णपणे बंद राहणार आहे.






पर्यावरण दिन, महिला दिन असे दिवस गेली कित्येक वर्षे सातत्याने साजरे झाल्यामुळे त्या त्या विषयाबाबत बरीच जागृती आणि सुधारणा होण्यास हातभार लागला आहे. पादचारी दिन साजरा केल्यानेही असाच फरक पडेल, ही ह्या दिनामागची संकल्पना आहे, असंही   मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडिया पोस्टमधून सांगितलं.






महत्त्वाच्या इतर बातम्या :


पुन्हा निर्बंध, बुस्टर डोस आणि आरोग्य विभागाच्या परीक्षेबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...


Pune Omicron Update : दिलासादायक...! पुण्यातील एक तर पिंपरी-चिंचवडमधील सहा ओमायक्रॉन रुग्ण बरे, अजित पवारांची माहिती