पुणे : पुण्यातील हडपसरमध्ये एका टेम्पोने महिला डॉक्टरला चिरडलं. या घटनेत डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. हडपसरमधील मगरपट्टा रोडवर कल्याण ज्वेलर्सजवळ ही घटना घडली.

अनुराधा पटनवार (वय 23 वर्ष) असं मृत डॉक्टरचं नाव असून त्या साने गुरुजी रुग्णालयातील काम करत होत्या.

अनुराधा स्कूटीवरुन जात असताना, एका टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये त्यांनी जागीच प्राण सोडले. तर अपघातानंतर टेम्पो चालकाने तिथून पळ काढला.

दरम्यान, अनुराधा पटनवार मूळच्या नांदेडच्या असून सध्या त्या भेकराईनगरमध्ये राहत होत्या.