Pune Bypoll Election : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंडखोरी (Kasba Bypoll Election केली तर मतांची विभागणी होणार आणि त्यांचा फायदा pune bypoll election भाजपला होणार, असं भाजपच्या नेत्यांना वाटणार त्यामुळे ते कॉंग्रेसच्या नेत्यांना जाऊन भेटत आहेत, असं वक्तव्य विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. पुण्याचे कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मात्र त्यापूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना अर्ज मागे घेऊ नका असं सांगितलं होतं. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले की, भाजपचे पदाधिकारी बंडखोरी करणाऱ्या कॉंग्रेसच्या बाळासाहेब दाभेकर यांना भेटले यात राजकारण आहे. ज्याप्रमाणे महाविकास आघाडीला कोणीही बंडखोरी करु नये, असं वाटणार त्याचप्रमाणे बंडखोरी केली तर मतांची विभागणी होणार आणि त्याचा भाजपला फायदा होणार,असं भाजपला वाटणार आहे. या गोष्टी साहजिक आहे. हे राजकारण आहे आणि राजकारणात या गोष्टी चालणार आहेत. त्यामुळे याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही.
प्रचारात सक्रिय राहणार
माजी आमदार मोहन जोशी आणि माझी भेट झाली. अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी माझ्याबरोबर होते, असं ते म्हणाले. त्यांनी प्रचारासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझी वेळ मागितली आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार असल्याने आम्ही एकत्र प्रचाराच उतरणार आहोत. यापूर्वीही अनेक निवडणुकांमध्ये आम्ही एकमेकांना साथ दिली आहे. महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर उमेदवार असल्याने मी प्रचारात सक्रिय असणार आहे, असं अजित पवार म्हणाले.
राज ठाकरेंसोबत चर्चा झाली नाही...
कसबा मतदार संघाच्या बाबतीत राज ठाकरे यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही यावर अजित पवार म्हणाले की, आमचं आणि राज ठाकरेंचं कोणतंही बोलणं झालं नाही. आमच्या वरिष्ठ नेत्यांचं किंवा बाकी कोणत्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचं राज ठाकरेंसोबत बोलणं झालं असेल तर त्यासंदर्भात मला कोणतीही कल्पना नाही असं अजित पवार म्हणाले. मात्र पोटनिवडणूक बिनविरोध करा, अशी मागणील राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केली होती. त्यानंतर त्यांचा पाठिंबा भाजपला असल्याचं स्पष्ट झालं होतं.
राहुल कलाटेंना कोणाची फूस?
चिंचवडमध्ये महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर राहुल कलाटे यांंनी बंडखोरी करणार असं जाहीर केलं आणि त्यांनी उमेदवारी अर्जदेखील भरला. राहुल कलाटेंना नेमकी कोणाची फूस आहे असं विचारल्यास अजित पवार म्हणाले की, त्यांना कोणाची फूस आहे यासंदर्भात मला कोणतीही कल्पना नाही मात्र ज्यावेळी राहुल कलाटे आणि माझी भेट होईल तेव्हा मी त्यांना या प्रश्नाचं उत्तर विचारीन असं त्यांनी स्पष्ट केलं.