पुणे : अनेकजण नोकरी करण्यासाठी मोठ्या शहरात जातात. आपलं (Pune News) गाव सोडून पैसे कमवण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र नोकरी करताना अनेकांना समाधान मिळत नाही. कधी आवडीचं काम करायला मिळत नाही तर कधी हवा तेवढा पगार मिळत नाही. त्यामुळे अनेकजण नोकरी सोडण्याची भाषा करत असतात. मात्र आर्थिक गाडा चालवण्यासाठी अनेकांंकडे दुसरा पर्याय नसल्याने मन मारुन आपली नोकरी करताना दिसतात. शिवाय अनेक नोकरीच्या ठिकाणी टॉक्झिक वातावरण असतं. त्यामुळे अनेकांना कामाच्या ठिकाणी मानसिक त्रास सहन करावा लागतो. मात्र या मानसिक त्रास आणि टॉक्झिक वातावरणाला धुडकावून लावत (Jobs In Pune)पुण्यातील एका तरुणाने थेट हटके कामाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या तरुणाची सध्या चांगलीच (Video Viral) चर्चा रंगली आहे.
तरुणानं नेमकं काय केलं?
अनिकेत नावाच्या तरुणाने मानसिक त्रासातून नोकरी सोडली. मात्र शेवटच्या दिवशी त्याने ढोलताशा वाजवत आपल्या ऑफिसचा शेवटचा दिवस साजरा केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. अनिकेत हा तरुण तीन वर्षांपासून एका कंपनीत सेल्स असोसिएट म्हणून काम करत होता. पगारवाढ न मिळाल्याने ते निराश झाला. त्यामुळे त्याने राजीनामादेऊन वाजत गाजत घरी जाण्याचा निर्णय घेतता. यावेळी त्याने ऑफिसमधील मित्रदेखील त्याच्यासोबत ढोलताशावर नाचताना व्हिडीओत दिसत आहे. याचवेळी त्याचा बॉस त्याला ओरडताना दिसत आहे.
अनिकेत आणि त्याच्या जवळच्या मित्रांनी मिळून हे सगळे केल्याचं दिसत आहे अनिकेतला बॉसकडून कधीच आदर मिळत नव्हता. त्यामुळे तो कायम निराश असायचा हा त्याच्यासाठी सगळ्यात मोठा दिसत असल्याचं त्याचा मित्र सांगत आहे. राजीनामा दिल्यानंतर आणि ढोल ताशावर नाचून झाल्यानंतर त्याचे मित्र आणि तो थेट मंदिरात गेले आणि समाधान व्यक्त केलं.
त्यानंतर त्यांच्या मित्रांनी जॉब सोडल्याची लहान पार्टी ठेवली होती. अनिकेतला जीम ट्रेनर व्हायचं आहे. मात्र आर्थिक परिस्थिती नीट नसल्याने तो नोकरी करत होता. त्याच्या मित्रांनी त्यांला चांगले बुट भेट म्हणून दिले आहेत. आता तो जीम ट्रेनर म्हणून काम करणार असल्याचं मित्राने व्हिडीओत सांगितलं आहे.
अनिकेतच्या मित्राने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्याने लिहिलंय की, अनेकजण या परिस्थितीतून जाताना दिसत आहे. साधारण सगळ्याच ऑफिसमध्ये अनेक कर्मचारी मानसिक त्रास सहन करत आहेत. बॉसकडून आदर न मिळणे आणि खच्चीकरण केलं जातं. त्यामुळे आत्मविश्वासदेखील कमी होतो. अनिकेत त्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा गाठण्यासाठी तयार आहे. कदाचित अनिकेतमुळे अनेकांना प्रेरणा मिळेल आणि अनेकजण आपल्याला समाधान मिळेल असं काम करतील.
इतर महत्वाची बातमी-
Pune Accident : पुण्यातील एम.जी रोडवर अपघात, आलिशान गाडीने 7 ते 8 गाड्या उडवल्या!