पुणे : हिवाळ्याला अजून(Pune Weather Update) सुरुवातच व्हायची आहे. (Pune news) मात्र पुणे शहरात थंडी (Winter) जाणवायला सुरुवात झाली आहे. कालपासून पुण्यातील तापमानात घट झाली आहे. महत्वाचं म्हणजे महाबळेश्वरपेक्षाही पुण्यात तापमान कमी नोंदवलं गेलं आहे. त्यामुळे पुणेकरांना ऑक्टोबर हिटपासून दिलासा मिळाला आहे. आयएमडीच्या आकडेवारीनुसार, महाबळेश्वरमध्ये किमान तापमान 15.6 अंश सेल्सिअस, तर पुण्यात 14.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
शहरात उत्तरेकडील थंड वारे वाहू लागल्याने तापमानात लक्षणीय घट दिसून येत आहे. शुक्रवारी (27 ऑक्टोबर) शिवाजीनगर येथे हंगामातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली, तर पाषाण येथे शहरातील रात्रीचे सर्वात कमी तापमान नोंदवले गेले. तापमान कमी होण्यास सुरुवात झाली असली तरी महाराष्ट्रात अद्याप हिवाळा सुरू झालेला नाही, असे भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या 3-4 दिवसांत शहरातील कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे, असंही ते म्हणाले.
IMD च्या आकडेवारीनुसार, पाषाणमध्ये गेल्या 24 तासांत किमान तापमानात 3 अंश सेल्सिअसची घट नोंदवली गेली आहे. 26 ऑक्टोबर रोजी ते 15.7 अंश सेल्सिअसवरून 27 ऑक्टोबर रोजी 12.2 अंश सेल्सिअसवर घसरले आहे. त्याचप्रमाणे लोहेगाव, कोरेगाव पार्क, हडपसर आणि मगरपट्टा भागातही रात्रीच्या तापमानात घट झाली आहे. त्याचवेळी शिवाजीनगरमध्ये या हंगामातील नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली आहे. आकडेवारीनुसार, शिवाजीनगरमध्ये रात्रीचे तापमान 14.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्य तापमानापेक्षा 2 अंशाने कमी आहे. या भागात कमाल तापमान 31.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आणि राज्यात जळगावमध्ये राज्यातील सर्वात कमी तापमान 10.9 अंश सेल्सिअस नोंदले गेले
पुण्यात विविध ठिकाणी किमान तापमान
चिंचवड-19.6
कोरेगाव पार्क -18.9
हडपसर -17.3
शिवाजीनगर -14.4
पाषाण -12.8
पुणं गारठणार, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात घट...
हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुणेकरांना ऑक्टोबर हिटनंतर (october heat)थंडीचा सामना करावा लागणार आहे. पुढील दोन दिवस थंडी वाढणार आहे. मागील काही दिवस पुण्यात उन्हाचे चटके जाणवत होते. या उन्हामुळे पुणेकर हैराण झाले होते. मात्र आता पुणेकरांना उन्हापासून दिलासा मिळणार आहे. त्यासोबतच विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक भागात किमान तापमान सरासरीपेक्षा किंचित खाली घसरलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या