पत्नी आणि दोन मुलींची हत्या करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 05 Feb 2017 12:40 PM (IST)
पुणे : बायको आणि दोन मुलींची हत्या करुन 42 वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यात घडलेल्या या हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील दत्तनगर परिसरातील टेल्को कॉलनीत ही घटना घडल्याची माहिती आहे. कर्जाला कंटाळून दीपक सखाहारी हांडे यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. दोन मुली आणि पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. 35 वर्षीय पत्नी स्वाती, 16 वर्षीय मुलगी तेजस आणि 12 वर्षीय मुलगी वैष्णवी यांचा मृत्यू झाला आहे. दीपक यांच्याकडे सुसाइड नोट मिळाली असून त्यामध्ये आम्ही चौघे आयुष्य संपवत आहोत, कोणाविरुद्ध काहीही तक्रार नाही, असं त्यात लिहिलं आहे. हांडे यांच्या शेजाऱ्यांनी घराची खिडकी फोडुन दरवाजाचे लॅच उघडून घरात प्रवेश मिळवला. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.