पुणे: पुण्यातील हिंजवडीत (Pune Hinjwadi Bus Fire) टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणाने धक्कादायक वळण समोर आलं आहे. ट्रॅव्हल्सला आग लागली नाही तर चालकाने गाडी पेटवल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळं चौघांचा जीव घेतल्याप्रकरणी अन पाच जणांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन कर्मचाऱ्यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवून देण्यात आल्याचं हे कृत्य चालकाने केल्याचं तपासात उघड झालं आहे. मात्र ज्यांना जीवे मारायचं होते, ते यातून बचावले आणि निष्पाप चौघांचा यात बळी गेला आहे. दिवाळी बोनससह पगार थकवला आणि चालक असून मजुरांची कामं सांगितली जात होती. म्हणून चालक जनार्दन हंबर्डीकरने हा कट रचला होता. मात्र पोलिसांच्या तपासात त्याचं बिंग फुटलं आहे. तर ज्या चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांनी दरवाजाचे लॉक चुकीच्या पध्दतीने उगडण्याचा प्रयत्न केलाने तो लॉक झाला असल्याची माहिती समोर आली आहे.(Pune Hinjwadi Bus Fire)

Continues below advertisement

हिंजवडीत मिनी बसमध्ये लागलेल्या आगीने अवघ्या 100 मीटर अंतरातच रौद्ररूप धारण केले. कारण त्यात वाहनचालकाने ठेवलेले ज्वलनशील बेंझिन सोल्यूशन होते. शॉर्टसर्किटमुळे लागलेली आग इतक्या कमी वेळेत पसरत नाही. शिवाय आपत्कालीन दरवाजा उजव्या बाजूने उघडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तो उघडला गेला नसल्याचे 'आरटीओ'च्या अधिकाऱ्यांनी सांगितलंं आहे. चालकाने गाडीत बेंझिन सोल्यूशन ठेवल्याने बसने तत्काळ पेट घेतला आणि त्यात शॉर्टसर्किट झाले. त्या वेळी चालकाने गाडीचा ताबा सोडून वाहनाच्या बाहेर उडी घेतली. तसेच काही कर्मचारी बाजूच्या दरवाजातून बाहेर पडले. हे काही क्षणातच घडले. विनाचालक गाडी 100 मीटरचे अंतरदेखील पुढे गेली नाही, तेवढ्यात आग मोठ्या प्रमाणात पसरली. मागे बसलेल्या कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन दरवाजातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी दरवाजाचे लॉक चुकीच्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न केल्याने तो लॉक झाला. दरम्यान, गाडीत आगीमुळे आणि धुरामुळे श्वास घेण्यात अडचणी आल्या त्यानंतर गुदमरून कर्मचारी बेशुद्ध पडले. आगीत त्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.(Pune Hinjwadi Bus Fire)

टेम्पो ट्रॅव्हल्स जाळण्याचे कारण काय?

दिवाळी बोनससह पगार थकवला आणि चालक असून मजुरांची कामे सांगितली जात होती. त्यामुळे टेम्पो चालक जनार्दन हंबर्डीकरने हा कट रचला होता. मात्र पोलिसांच्या तपासात त्याचं बिंग फुटलं. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केल्याने या घटनेवर हळहळ व्यक्त करणाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान, हे सर्व कर्मचारी सकाळच्या शिफ्टला ऑफिसला चालले होते.

Continues below advertisement

ते शेवटपर्यंत झगडले

गाडीच्या जळालेल्या लोखंडावर ओरखडे होते. ते शेवटच्या क्षणापर्यंत जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. कोणीतरी त्या बंद दरवाज्याला ओरबाडून उघडायचा प्रयत्न केला होता. जीवाच्या अकांताने ते दार उघडण्याचा प्रयत्न करत असतील. पण तो दरवाजा उघडला नाही. फुटलेल्या काचांवरही असेच निशाण होते. ते शेवटपर्यंत झगडले होते. या घटनेनंतर त्या जळालेल्या बसच्या कोपऱ्यामध्ये जेवणाचे डबे, जळालेल्या चपला दिसत होत्या. या बसमधील जळालेल्या सीटचा कोळसा झाला आहे. गाडीच्या आतील धातू देखील वितळला आहे.