Pune Hinjewadi Murder Case Update : पुण्यातील हिंजवडी आयटी हबमध्ये अभियंता महिलेच्या (IT Engineer) हत्याकांडामध्ये दररोज नवनवे खुलासे होत आहेत. इंजिनियर तरुणीच्या हत्यप्रकरणातील संशयित आरोपी ऋषभ राजेश निगम याने ज्या मित्राकडून पिस्तूल घेतले होते. त्यानेही प्रेयसीची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर स्वत:वर गोळी झोडून जीवन संपवलं होतं. ऋषभ याने मित्राच्या पावलावर पाऊल टाकत (pune crime News Update) आपल्या प्रेयसीला संपवलं. हिंजवडीतील या घटनेनं रविवारी खळबळ माजवली होती. वंदना द्विवेदी असे हिंजवडीमध्ये खून झालेल्या तरुणीचं नाव आहे.
लखनौमधील ऋषभ याने रविवारी प्रेयसी वंदना हिच्यावर पाच गोळ्या झाडल्या होत्या. यामध्ये तिचा दुर्देवी मृत्यू झाला. पण या घटनेनं पुण्यात खळबळ माजवली. पुण्यातून पळ काढणाऱ्या ऋषभला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ऋषभ निगम ब्रोकर म्हणून लखनौमध्ये काम करतो. त्याला रिअल इस्टेट व्यावसायात दबदबा निर्माण करायचा होता. त्यासाठी त्याने मित्राकडून 2015 मध्ये पिस्तुल घेतले होते. ऋषभ त्यावेळी वंदना हिच्या घराशेजारी राहत होता. त्यावेली त्याचं आणि वंदनाचं सूत जुळलं. त्याच्या मित्राचेही एका मुलीसोबत अफेअर होतं. 2018-19 मध्ये त्याच्या मित्राचं आणि प्रेयसीचा वाद झाला. त्यावेळी ऋषभ याच्या मित्राने रागाच्या भरात प्रेयसीला गोळ्या झाडून संपवलं होतं. त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली होती. ऋषभ यानेही पुण्यात राहणाऱ्या प्रेयसीवर गोळ्या झाडून खून केला.
मित्राच्या पावलावर पाऊल
ऋषभ आणि वंदना यांच्यामध्ये अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. वंदना कामानिमित्त पुण्यात आली. इंजिनियर वंदना हिंडवाडी आयटीमध्ये कार्यरत होती. दोघांमध्ये लाँग डिस्टन्स रिलेशनशीप होते, त्यामुळे संवाद आपोआपच कमी झाला. त्यातून ऋषभच्या डोक्यात संशायचं भूत आलं. त्यांच्यामध्ये खटके उडायला सुरुवात झाली. ऋषभनेही मित्राप्रमाणेच शांत डोक्याने प्रेयसीला संपवलं असावे असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येतोय.
कुटुंबाची होणार चौकशी -
ऋषभ निगम सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीमध्ये ऋषभ याच्याकडून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. वंदना आणि ऋषभ यांच्यामध्ये संबंध कसे होते. ते एकमेंकांना कधीपासून ओळखतात. त्यांच्या वादाची माहिती होते का? यासारख्या प्रश्नाची सरबत्ती दोन्ही कुटुंबांवर होणार आहे. पुणे पोलिस ऋषभ आणि वंदना यांच्या कुटुंबियांची चौकशी करणार असल्याचं समोर आले आहे.ट
आणखी वाचा :