शिवनेरी किल्ल्यावर झाडाला गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 15 Jun 2018 09:10 AM (IST)
ही तरुणी कोण आहे आणि तिने आत्महत्या का केली हे अद्याप समजलेलं नाही. तिची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे.
पुणे : पुण्यात शिवनेरी किल्ल्यावर एका तरुणीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी सहा वाजता ही घटना उघडकीस आली. जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाजवळ तिचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. या तरुणीची मोटरसायकल गडाखाली आढळली आहे. तर आत्महत्या केली त्या ठिकाणी तिची बॅगही सापडली. सुहानी रघुनाथ खंडागळे असं या तरुणीचं नाव असून आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. जुन्नर पोलिस पुढील तपास करत आहेत.