पुण्यात मानाच्या पाचही गणपतींचं काल (23 सप्टेंबर) विसर्जन करण्यात आलं. त्यानंतर आज पहाटे पाच वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन करण्यात आलं.
दगडूशेठ गणपतीच्या विसर्जनासाठी भव्य रथ
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जनासाठी भव्य रथ तयार करण्यात आला होता. अतिशय मनमोहक नक्षींनी हा रथ सजला होता. मोती रंगाच्या 27 हजार दिव्यांनी उजळलेला हा रथ डोळे दिपावणारा होता. त्यावर रंगीबेरंगी कोरीवकाम केलेले 5 कळस बसवण्यात आले होते. तब्बल 225 आकर्षक झुंबर रथावर लावण्यात आले होते. विवेक खटावकर यांनी साकारलेल्या श्री विश्वविनायक रथातून दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक चार तास आधी निघाली. अखेर पहाटे पाच वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन झालं.
मानाचे पाच गणपती
पुण्यातल्या गणेशोत्सवाच्या आकर्षणाचं केंद्र म्हणजे मानाचे पाच गणपती. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती या पाचही मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी आणि आता विसर्जनसाठीही राज्यभरातून गणेशभक्त पुण्यात येतात.
L I V E - U P D A T E
- पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं पहाटे पाच वाजता विर्सजन झालं. नेहमीपेक्षा यावर्षी दगडूशेठ गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक जवळपास चार तास आधी सुरु झाली होती. दरवर्षी दगडूशेठ गणपतीला मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी रात्रीचे दोन वाजतात. मात्र यंदा दगडूशेठच्या पुढे असलेल्या गणेश मंडळांना, ती मंडळे डीजे वापर करत असल्या कारणानं लक्ष्मी रस्त्यावरुन हटवण्यात आलं. त्यामुळे दगडूशेठ गणपतीचं यंदा लवकर विसर्जन झालं.
- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती नेहमीपेक्षा चार तास लवकर गणपती मिरवणुकीत सहभागी
- मानाचा पाचवा केसरी वाडा गणपतीचं संध्याकाळी 7.10 वाजता विसर्जन
- मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचं संध्याकाळी 6.45 वाजता विसर्जन
- मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचं संध्याकाळी 5.30 वाजता विसर्जन
- मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं संध्याकाळी 4.55 वाजता विसर्जन
- मानाचा पहिला कसबा गणपतीचं दुपारी 4.05 वाजता विसर्जन
- मानाचा पहिला गणपती कसबा गणपती अलका चौकात दाखल
- मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती समोरची पथकं बेलबाग चौकात दाखल
- कसबा गणपतीसमोर परदेशी नागरिक मिरवणुकीत सहभागी
- मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती लक्ष्मी रोडवर
- मानाचा पाहिला कसबा गणपती लक्ष्मी रोडवर मार्गस्थ, तर दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती बेलबाग चौकात
- मानाचे चार गणपती महात्मा फुले मंडईतून मार्गस्थ
- VIDEO : पुण्यातील रस्त्यांवर भव्य आणि आकर्षक रांगोळ्या
1) मानाचा पहिला कसबा गणपती
सकाळी 9 वाजता मंडपातून बाहेर
10 वाजता मंडई जवळ आगमन
10.30 पालकमंत्री आणि महापौरांच्या हस्ते पूजा
10.40 मिरवणुकीला सुरुवात
दुपारी 3.10 ला अलका टॉकीज चौकात दाखल
दुपारी 4.05 वाजता विसर्जन
2) मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी
सकाळी 9.15 वाजता मंडपाबाहेर
10.45 वाजता मंडई जवळून मिरवणुकीला सुरुवात
3.50 वाजता अलका टॉकीज चौकात आगमन
संध्याकाळी 4.55 वाजता विसर्जन
3) मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती
सकाळी 9.30 वाजता मंडपाबाहेर
10.45 वाजता मंडई जवळ
11 वाजता मिरवणुकीला सुरुवात
संध्याकाळी 5 वाजता अलका टॉकीज चौकात आगमन
संध्याकाळी 5.30 वाजता विसर्जन
4) मानाचा चौथा तुळशीबाग गणपती
सकाळी 9.45 वाजता मंडपाबाहेर
11 वाजता मंडई जवळ
11.15 वाजता मिरवणुकीला सुरुवात
संध्याकाळी 6.45 वाजता विसर्जन
विसर्जन वैशिष्ट्य: महिलांचं लेझीम पथक, मल्लखांब प्रात्यक्षिक
5) मानाचा पाचवा गणपती केसरी वाडा (125 वं वर्ष)
10 वाजता मंडपाबाहेर
11.45 मिरवणुकीला सुरुवात
संध्याकाळी 7.10 वाजता विसर्जन
- डीजे आणि स्पीकरवरच्या बंदीनंतर पुण्यातील काही गणेश मंडळं आक्रमक झाली आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीत सव्वाशेहून अधिक मंडळं गणेशमूर्तींचं विसर्जन करणार नाहीत. ही मंडळं बाप्पाची मूर्ती मंडपातच ठेवणार आहेत.