पुणे: पुण्यातील गणपतीची विसर्जन मिरवणुकीतील शेवटचा गणपती अलका चौकातून मार्गस्थ झाला आहे. शेवटचं गणपती मंडळ हे महाराष्ट्र तरुण मंडळ आहे. शहरात काल सकाळी साडे दहा वाजता सुरू झालेली विसर्जन मिरवणूक आता संपली आहे. 189 गणेश मंडळे अलका चौकातून गेली आहेत. शहरातील विसर्जन मिरवणूक ही 28 तासांपेक्षा जास्त काळ चालली आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत 172 मंडळ अलका टॉकीज चौकातून क्रॉस झाली आहेत. कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यांवरील अनेक गणपती अजूनही अलका टॉकीज चौकात पोहोचणार आहेत. मागच्या वर्षी एकूण 239 मंडळ होती. मागच्या वर्षी 4 वाजून 20 मिनिटांनी शेवटचा गणपती अलका टॉकीज चौकातून क्रॉस झाला होता.
महाराष्ट्र तरुण मंडळ हे पुण्यातील शेवटचे विसर्जन होणारे गणेश मंडळ आहेत. काल 10 वाजून 30 मिनिटांनी पुण्यातली मिरवणूक सुरू झाली होती. त्याला आता जवळपास 28 तासांपेक्षा जास्त वेळ झाला आहे.
मिरवणूक लवकरात लवकर संपवण्याचे आयुक्तांचे आवाहन
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, मिरवणुकीचं योग्य नियोजन करण्यात आलं आहे. मात्र पुण्यातील मिरवणुकीत अनेक मंडळांनी लेसर लाइटचा वापर केला आणि सोबतच डीजेचा वापर केला आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस तैनात आहेत. मिरवणूक लवकरात लवकर संपवण्याचे आवाहन गणेश मंडळांना केलं जात आहेत. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे विसर्जन मिरवणुका उशिरापर्यंत चालणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मानाचा पहिला - कसबा गणपती
10:30 - मिरवणुकीची सुरुवात11:10 - बेलबाग चौकात 3:35 - अलका चौक4:32 - नटेश्वर घाटावर विसर्जनमानाचा दुसरा - तांबडी जोगेश्वरी10:40 - मिरवणुकीला सुरुवात12:00 -बेलबाग चौक4:12 - अलका चौक5:10 - नटेश्वर घाटावर विसर्जनमानाचा तिसरा - गुरुजी तालीम11:10 - मिरवणुकीला सुरुवात1:12 - बेलबाग चौक5:16 - अलका चौक 6:43 - नटेश्वर घाटावर विसर्जन मानाचा चौथा - तुळशीबाग11:50 - मिरवणुकीला सुरुवात2:20 - बेलबाग चौक6:17 - अलका चौक7:12 - पाताळेश्वर घाटावर विसर्जन मानाचा पाचवा - केसरीवाडा12:25 - मिरवणुकीला सुरुवात3:23 - बेलबाग चौक6:27 - अलका चौक7:38 - पाताळेश्वर घाटावर विसर्जन
डीजेच्या आवाजावरून पोलिस आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यात वादावादी
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या आवाजावरून पोलिस आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यात वादावादी झाल्याचं दिसून आलं. पुण्यातील गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणूका अलका चौकात आल्याकी प्रत्येक मंडळाचे महापालिकेकडून नारळ देऊन स्वागत केले जाते. त्यानंतर त्या मंडळाने विसर्जन घाटावर जाऊन विसर्जन करणे अपेक्षित असते.नमात्र अनेक मंडळे अलका चौकातून पुढं गेल्यावर देखील डी जे सुरु ठेवून कार्यकर्ते नाचतात. त्यामुळे पाठीमागील मंडळांची विसर्जन मिरवणूक रखडते. पुण्यातील विसर्जन मिरवणूक याहीवर्षी संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे पोलिसांनी डी जे वाजवणाऱ्या मंडळांवर कारवाई करायला सुरुवात केल्यावर वाद झाला.