पुणे: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुका गेल्या वर्षीचा रेकॉर्ड मोडतील असं चित्र आहे. पुण्यातील मिरवणूक सुरु होऊन 27 तास उलटले आहेत. तरीदेखील मिरवणुका अजून सुरूच आहेत. दुपारी 1 वाजेपर्यंत 172 मंडळ अलका टॉकीज चौकातून क्रॉस झाली आहेत. कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यांवरील अनेक गणपती अजूनही अलका टॉकीज चौकात पोहोचणार आहेत. मागच्या वर्षी एकूण 239 मंडळ होती. मागच्या वर्षी 4 वाजून 20 मिनिटांनी शेवटचा गणपती अलका टॉकीज चौकातून क्रॉस झाला होता. मात्र यावर्षी हा रेकॉर्ड मोडणार की आधीच मिरवणुका संपणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र तरुण मंडळ हे पुण्यातील शेवटचे विसर्जन होणारे गणेश मंडळ आहेत. पुण्यातील विसर्जन मिरवणुकीमधील शेवटचा गणपती विसर्जन होणार आहे. काल 10 वाजून 30 मिनिटांनी पुण्यातली मिरवणूक सुरू झाली होती. त्याला आता जवळपास 28 तास पुर्ण होत आहेत. अलका चौकात शेवटचा मंडळ दाखल होत आहे.
पुण्यातील मिरवणूक संपण्यासाठी अजून एक ते दीड तास लागण्याची शक्यता
शहरातील 25 तास उलटूनही पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुका अद्याप सुरूच आहे. अजूनही पुण्यातील लक्ष्मी रोड, केळकर रोड, टिळक रोडवर मंडळांची मिरवणूका सुरूच आहेत. कुमठेकर रोडवरील गणपती मिरवणुका संपल्या आहेत. मिरवणूक संपण्यासाठी आणखी 1 ते दीड तास लागण्याची शक्यता आहे.
मिरवणूक लवकरात लवकर संपवण्याचे आयुक्तांचे आवाहन
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, मिरवणुकीचं योग्य नियोजन करण्यात आलं आहे. मात्र पुण्यातील मिरवणुकीत अनेक मंडळांनी लेसर लाइटचा वापर केला आणि सोबतच डीजेचा वापर केला आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस तैनात आहेत. मिरवणूक लवकरात लवकर संपवण्याचे आवाहन गणेश मंडळांना केलं जात आहेत. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे विसर्जन मिरवणुका उशिरापर्यंत चालणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मानाचा पहिला - कसबा गणपती
10:30 - मिरवणुकीची सुरुवात
11:10 - बेलबाग चौकात
3:35 - अलका चौक
4:32 - नटेश्वर घाटावर विसर्जन
मानाचा दुसरा - तांबडी जोगेश्वरी
10:40 - मिरवणुकीला सुरुवात
12:00 -बेलबाग चौक
4:12 - अलका चौक
5:10 - नटेश्वर घाटावर विसर्जन
मानाचा तिसरा - गुरुजी तालीम
11:10 - मिरवणुकीला सुरुवात
1:12 - बेलबाग चौक
5:16 - अलका चौक
6:43 - नटेश्वर घाटावर विसर्जन
मानाचा चौथा - तुळशीबाग
11:50 - मिरवणुकीला सुरुवात
2:20 - बेलबाग चौक
6:17 - अलका चौक
7:12 - पाताळेश्वर घाटावर विसर्जन
मानाचा पाचवा - केसरीवाडा
12:25 - मिरवणुकीला सुरुवात
3:23 - बेलबाग चौक
6:27 - अलका चौक
7:38 - पाताळेश्वर घाटावर विसर्जन