Pune: पुणेकरांसाठी गणेशोत्सवाचा उत्साह दिवसेंदिवस वाढतोय. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस विभागाने गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी व नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. गणेशोत्सवाच्या शेवटच्या सात दिवसांत पुणे शहरातील चार प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. तसेच शहरातील 12 रस्त्यांवर जड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

Continues below advertisement

कोणते रस्ते राहतील सायंकाळी बंद?

गणेशोत्सवाच्या मिरवणुका, भाविकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि पायी जाणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी चार रस्ते रोज सायंकाळी ५ नंतर बंद ठेवण्यात येणार आहेत.

लक्ष्मी रस्ता : हमजेखान चौक ते टिळक चौक

Continues below advertisement

शिवाजी रस्ता : गाडगीळ पुतळा चौक ते मंडई परिसर

बाजीराव रस्ता : पूरम चौक ते अप्पा बळवंत चौक

टिळक रस्ता : हिराबाग चौक ते नेहरू स्टेडिअम परिसर

या मार्गांवर वाहनांना प्रवेश नसेल, त्यामुळे नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे वाहतूक पोलिसांनी आवाहन केले आहे.

जड वाहनांवर संपूर्ण बंदी

गणेशोत्सवात दिवसभर आणि विशेषतः रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर कोंडी होते. त्यामुळे 12 प्रमुख रस्त्यांवर जड वाहनांना संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. यात बस, ट्रक, कंटेनर, डंपर आदी वाहनांचा समावेश आहे.

बंदी असलेले प्रमुख रस्ते :

शास्त्री रोड,टिळक रोड,कुमठेकर रोड,लक्ष्मी रोड,केळकर रोड,बाजीराव रोड,शिवाजी रोड,कर्वे रोड,एफसी कॉलेज रोड,जंगली महाराज रोड,सिंहगड रोड,गणेश रोड

पोलिसांचे आवाहन

पुणे वाहतूक पोलिसांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. "गणेशोत्सव हा पुण्याचा आत्मा आहे. मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांची सोय होण्यासाठी हे निर्णय घेण्यात आले आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिसांना सहकार्य करावे," असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले. वाहतुकीतील या बदलांमुळे कार्या

पीएमपी बससाठी हा असेल मार्ग

शिवाजीनगर बसस्‍थानकावरून शिवाजीरस्‍त्‍याने स्‍वारगेटला जाणाऱ्या बस या स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्‍ता व टिळक रस्‍त्‍याने स्‍वारगेटला जातील. मनपा बसस्‍थानकावरून स्‍वारगेटला जाणाऱ्या बस या जंगली महाराज रस्‍ता, अलका टॉकीज चौक, टिळक रस्‍ता, शास्‍त्री रस्‍त्याने स्‍वारगेटला जातील.