पुणे : पुण्यातील मिरवणुकीत यंदा शंख वादन सगळ्यात आकर्षक (Pune Ganeshotsav 2023) दिसत आहे. पुण्यातील भाऊसाहेब रंगारी या गणपती मंडळाबाहेर या पथकाने शंखवादन केलं. यावेळी मोठं प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं. केशरी रंगाच्या वेशभुषेत हे पथक अगदी उठून दिसत होतं शंखासोबतच वेगवेगळी पारंपारिक आणि दुर्मिळ वाद्यदेखील वाजवण्यात आली. मागील सात ते आठ वर्षांपासून पुण्यात केशव शंखनाद पथक म्हणून आम्ही काम करत आहोत. आजपर्यंत आपण फक्त ढोल ताशा पथक, ध्वज पथक,लेझीम पथक असे ऐकूण होतो आणि बघितलंही पण शंखनाद पथक पुर्णपणे एक पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक शंख वाद्य एकत्रित वाजवणाऱ्यांचं पथक आहे आणि पुण्यातील हे एकमेव शंख पथक आहे, असं या पथकाचे प्रमुख सांगतात.
उद्देश काय? केशवच नाव का?
आपली धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक,वाद्यं का आणि कशासाठी वाजवली जात होती आणि त्याने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काय फायदे होतात. यासाठी पथकाच्या माध्यमातून शंखाचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने केशव शंखनाद पथका तयार करण्यात आलं आहे. ज्यांनी जगाला गीतेच्या उपदेश देवून समाज घडविण्यासाठी प्रेरणा दिली, त्या भगवान श्रीकृष्णचे नावही केशव आहे. अखंड हिंदुस्तानातील हिंदूसमाजाला संघटित करून देव देश धर्मासाठी काम करण्याची शिकवण देवून परम पवित्र भगवा ध्वज आपले गुरू स्थानी ठेवून एकत्रित केलं असे संघ संस्थापक आद्यसरसंघचालक डॉ केशव हेडगेवार यांच्याही नावाचा समावेश आहे. त्यामुळे नावाने संपूर्ण जगात शंख ध्वनीने परिवर्तन व्हावे, असं आम्हाला वाटतं, असंही ते म्हणाले.
2017 मध्ये गणेशोत्सवात शंखनाद करायचा या उद्देशाने शंखनाद पथकाचा सराव पुण्यातील प्रसिद्ध ओमकारेश्वर मंदिरात एक महिना सराव सुरू केला त्यात महिला आणि पुरुषसंख्या फक्त पाच ते सात होती नंतर ती वाढतच गेली. पुण्यातील प्रमुख गणेश मंडळाच्या आरतीला उपस्थित राहून शंखनाद करत होतो. त्यानंतर गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीत मानाचे गणपतीत स्थिर वादन करू लागलो.
अनेक ठिकाणी सादरीकरण
पुणे शहराबरोबरंच पिंपरी-चिंचवड शहरातदेखील केशव शंखनाद पथकाने शंखनाद केलंय. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या लांडगे आळीतील श्रीराम गणेश मंडळ , पिंपरी येथील आसवाणी गृप यांचे इको फ्रेडली गणेश विसर्जन कार्यक्रमाला शंखवादन केलं आहे आणि शारदीय नवरात्री उत्सवात संपूर्ण नवरात्र विशेष पुणे शहराचे वैभव चतु:शृंगी देवी मंदिरात रोज सकाळी आणि संध्याकाळी महाआरतीचामान आपल्या केशव शंखनाद पथकाला दिला गेला. तसेच आकृर्डी प्राधिकरण येथील अमितजी गावडे यांचे श्री समर्थ युवा प्रतिष्ठान येथे मोठ्या जोशात शंखनाद झाले.
इतर महत्वाची बातमी-