पुणे:  पुण्यातील बेलबाग चौकामध्ये (Belbaug Chowk) गणपती विसर्जन मिरवणुकीत इतर ढोल-ताशा पथकांप्रमाणे ढोल ताशा पथकाचाही ताल सुरु होता आणि त्याच्या ठेक्यावर तरुणाई थिरकत होती. मात्र बेलबाग चौकात अॅम्ब्युलन्स आली आणि अॅम्ब्युलन्सला वाट करुन देण्याचं आवाहन पोलिस करत होते.  अॅम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज येताच हजारो पुणेकरांनी रस्ता करुन दिला. अॅम्ब्युलन्सला वाट करून देण्यासाठी पथकाने वादन थांबवलं. कार्यकर्ते, स्वयंसेवक, पोलिसांच्या मदतीने हजारोंची गर्दी दोन भागात विभागली. काही वेळात मधल्या रस्त्यातून अॅम्ब्युलन्स कोणत्याही अडथळ्याविना निघून गेली. यानंतर पुन्हा मिरवणुकीला त्याच जल्लोषात सुरुवात होते. 


व्हिडीओची पुणेकरांमध्ये जोरदार चर्चा


एका इमारतीच्या छतावरुन हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीचं शूटिंग करत असताना ही दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली. गडबड गोंधळ, ढकलाढकली, चेंगराचेंगरी न होता ही अॅम्ब्युलन्स रुग्णालयाकडे निघून गेली आहे. या व्हिडीओची पुणेकरांमध्ये जोरदार चर्चा आहे. 


2000 गणपती मंडळांचं विसर्जन, 9 हजार पोलीस तैनात


पुण्यात दिमाखात गणेशोत्सव साजरा केला जातो. हाच उत्सव नीट पार पाडण्याची जबाबदारी पुणे पोलिसांची असते. 10 दिवस उत्तम कामगिरी पार पाडल्यानंतर पुण्यातील गणपतीच्या मिरवणुकीचं नियोजन करण्यात आलं आहे. यात 29 सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्थीच्या दिवशी पुण्यातील काही रस्ते बंद करण्यात आले. 28 तारखेला होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात बीडीडीएस पथके, आरसीपी, क्युआरी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. 28 तारखेला जवळपास 2000 सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतीचे विसर्जन होईल. विसर्जन मिरवणुकीसाठी 9 हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा बंदोबस्त असणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लक्ष मिरवणूक मार्गावर असणार आहे, अशी माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे.


 रुग्णवाहिकेसाठी स्वतंत्र मार्ग


या कालावधीत काही अनुचित घटना घडू नये यासाठी गोपनिय यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. चेनस्नैचिंग, महिला छेडछाड रोखण्यासाठी वेगवेगळी पोलीस पथके तैनात करण्यात आलेली आहेत. लहान मुले वयोवृद्ध यांचे सहाय्यतेसाठी मदत केंद्र उभारण्यात आलेली आहेत. इमर्जंसी परिस्थीतीमध्ये अॅम्बुलंन्ससाठी स्वतंत्र मार्ग नियोजीत करण्यात आलेले आहेत.


हे ही वाचा :                                   


Pune Ganeshotsav 2023 : पुण्यातील मंडळांमध्ये मतमतांतर नाहीत, लवकरात लवकर विसर्जन पार पाडणार; कसबा गणपती अध्यक्षांचा दावा, मंडळांचा क्रमही सांगितला...


पाहा व्हिडीओ :