पुणे : पुणे शहर पोलिसांनी गणेशोत्सवादरम्यान (Pune ganeshotsav 2023) सुरक्षेच्या कारणास्तव पुढील 11 दिवस शहरात ड्रोन आणि इतर उडणाऱ्या वस्तू उडवण्यास बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी शहर परिसरात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.


पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) यांनी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रो-लाइट, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरामोटर, हँडग्लायडर, हॉट एअर बलून इत्यादींचा वापर दहशतवाद्यांकडून दहशतवादी कारवायांसाठी केला जाऊ शकतो. लोक किंवा व्हीआयपी जे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या निर्माण करू शकतात. अशी कोणतीही शक्यता टाळण्यासाठी आजपासून ते 29 सप्टेंबर या कालावधीत या वस्तूंच्या उड्डाणांवर शहरात निर्बंध घालण्यात येणार आहेत. शहर पोलीस पाळत ठेवण्यासाठी वापरत असलेल्या ड्रोन आणि उडत्या वस्तूंना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.


या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 188 नुसार शिक्षा केली जाईल, असंही पोलिसांनी म्हटले आहे. पोलीस अधिकार्‍यांना जनजागृतीसाठी पोलीस स्टेशन आणि इतर आस्थापनांना अधिकृत आदेश देण्यास सूचित करण्यात आले आहे. उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक शहर परिसरात भेट देतात. त्यामुळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे.


दोन दहशतवादी सापडल्याच्या पार्श्वभूमीवर शहर हाय अलर्टवर 


काही दिवसांपूर्वी पुण्यात दोन दहशतवादी सापडले होते. कोथरुडसारख्या परिसरात चोरीच्या गुन्ह्यात पकडलेल्या दोघांचा संपर्क ISIS सारख्या देशविरोधी संघटनांशी संपर्क असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता बंदूक आणि स्फोटकं आढळली होती. त्यानंतर बॉम्ब बनवण्याचं साहित्य आणि क्रिया लिहिलेली चिठ्ठीदेखील सापडली होती. पुण्यातील कोंढवा परिसरात हे दोघं राहत होते. त्यानंतर पुण्यातील कोंढवा परिसरातूनच एका भूलतज्ञ असणाऱ्या डॉक्टरला ISIS मध्ये भरती करुन घेतो या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यामुळे पुण्यात चांगलीच खळबळ उडाली होती. त्यामुळे यंदा कडेकोट बंदोबस्त कऱण्यात येणार आहे. 


1,800 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर


उत्सवादरम्यान गर्दीवर 1,800 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. पोलिसांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुणे पोलिसांनी नुकतीच कोथरूड परिसरातून दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. उत्सवादरम्यान दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या :


Pune Ganeshotsav 2023 : सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना