पुणे : गोळीबाराच्या तीन घटनांनी बुधवारी पुणे हादरलं होतं. येवलेवाडी येथील गोळीबारात जखमी झालेल्या अमृत परिहारचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. तर चंदननगरमध्ये एकता भाटी यांच्या हत्येतील आरोपी बाप-लेकाला पोलिसांनी अटक केली आहे.
चंदननगरमध्ये झालेल्या गोळीबारात एकता भाटी यांचा मृत्यू झाला होता. या घटनेतील आरोपींनी तपास करणाऱ्या पोलिसांवरही गोळीबार केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बाप-लेकाला अटक केली आहे. दोघांनी 30 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोप एकता भाटी यांच्या पतीची हत्या करण्यासाठी आले होते. मात्र पती न सापडल्याने त्यांनी एकता यांची हत्या केली. एकता भाटी आणि त्यांचा पती काही वर्षांपूर्वी दिल्लीतून पुण्यात आले होते. मात्र आरोपींना हा हल्ला का केला याचा तपास पोलीस करत आहेत.
येवलेवाडीतील गणेश ज्वेलर्समध्ये झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्या अमृत परिहारचा मृत्यू झाला आहे. लुटमारीच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याचं उघड झालं आहे. या हल्ल्यात वापरण्यात आलेल्या दोन बाईक पोलिसांनी जप्त केल्या आहेत.