उमर आणि जिग्नेश यांच्याविरोधात पुण्यातील विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. भीमा-कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानांतर्गत 31 डिसेंबरला शनिवारवाड्यात ‘एल्गार परिषदे’चं आयोजन करण्यात आलं होतं. याच एल्गार परिषदेत जिग्नेश मेवाणींनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप होता. काही युवकांनी पुण्याच्या डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार केली होती.
31 डिसेंबरला झालेल्या पुण्यातील एल्गार परिषदेला ‘समस्त हिंदू आघाडी’चे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी तीव्र विरोध केला होता. हा कार्यक्रम झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. तसंच हा कार्यक्रम होऊ नये याबाबत त्यांनी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना निवेदनही दिलं होतं.
जिग्नेश आणि उमरच्या कार्यक्रमावरुन गोंधळ, कार्यकर्त्यांची धरपकड
दुसरीकडे, हिंदू आघाडीच्या आधी पेशव्यांच्या वंशजांनी देखील हा कार्यक्रम शनिवारवाड्यावर घेण्यास विरोध केला होता. पण महापौर मुक्ता टिळक यांनी परिषदेला सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून महापालिकेने परवानगी दिली होती.
मुंबईत आज (4 जानेवारी) छात्र भारतीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे पोलिस आणि आयोजकांमध्ये बाचाबाची झाली. या कार्यक्रमातही जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांची भाषणं होणार होती. मात्र पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी दिलेली नाही.
पुण्यात जिग्नेश मेवाणी, उमर खालिदविरोधात पोलिसात तक्रार
भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काल महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. त्यावेळी मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं होतं. त्यामुळे मुंबईत जमावबंदी आहे, कार्यक्रम करता येणार नाही, असं पोलिसांनी आयोजकांना सांगितलं. मात्र आम्ही आधीच कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे, आता कार्यक्रम रद्द करु शकत नाही, असं म्हणत कार्यकर्त्यांनी पोलिसांनी हुज्जत घातली.