पुणे : पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट ओपन करुन त्यावर महिलांचे अश्लील फोटो पोस्ट केल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी 30 वर्षीय व्यक्तीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.
22 जून हा प्रकार रोजी उघडकीस आला होता. ऋतुराज नलावडे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. गिरीश बापट यांचे माध्यम सल्लागार सुनील माने यांनी फिर्याद दिली होती.
आरोपीने गिरीश बापट यांच्या मूळ खात्यावरुन काही फोटो घेतले आणि फेसबुकवर त्यांच्या नावाने बनावट अकाऊंट तयार केलं. त्यावर महिलांचे अश्लील फोटो टाकण्यात आले होते. दरम्यान याची माहिती मिळताच बापट यांचे माध्यम सल्लागार माने यांनी बंडगार्डन पोलिसांमध्ये याप्रकरणी फिर्याद दिली होती.
आरोपीची पत्नी शिक्षिका असून पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवणार होती, त्याचा प्रचार करण्यासाठी आरोपीने मे महिन्यात 17-18 बनावट अकाऊंट्स तयार केली होती. त्यातच एक गिरीश बापट यांच्या नावाचे होते.
विशेष म्हणजे आरोपी स्वतःला पत्रकार म्हणवून घेतो, त्याचप्रमाणे कधीतरी 'ग्रामशासन' नावाचं साप्ताहिक काढतो. आरोपीने स्वतः अश्लील फोटो टाकले नसून कुणीतरी त्याला टॅग केले होते आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला अशी माहिती नंतर सांगण्यात आली.
या प्रकरणी 22 जूनला तक्रार देण्यात आली होती. आरोपीला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
गिरीश बापटांच्या नावे फेसबुकवर फेक अकाऊंट, आरोपीला बेड्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jul 2017 08:59 PM (IST)
पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट ओपन करुन त्यावर महिलांचे अश्लील फोटो पोस्ट केल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी 30 वर्षीय व्यक्तीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -