पुण्यात दोन पुरुष आणि चिमुरड्याचा मृतदेह नाल्यात सापडले
एबीपी माझा वेब टीम | 23 Feb 2018 10:40 PM (IST)
पुण्याच्या सोमवार पेठ सारख्या मध्यवस्तीत असलेल्या नागरी नाल्यामध्ये तिघांचे मृतदेह सापडले.
पुणे : पुण्यात एका नाल्यामध्ये तिघांचे मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. तिन्ही मृतदेह पुरुषांचे असून त्यात एका चिमुरड्याचा समावेश आहे. पुण्याच्या सोमवार पेठ सारख्या मध्यवस्तीत असलेल्या नागरी नाल्यामध्ये तिघांचे मृतदेह सापडले. मृतदेहांची अवस्था वाईट असल्यामुळे त्यांची ओळख पटवणं कठीण जात आहे. त्यामुळे हत्येचं कारणही अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. लवकरच तिघांच्या मारेकऱ्यांचा शोध लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.