पुणे : एखाद्या खाद्यपदार्थाच्या डब्यातून सव्वा कोटी रुपये लपवून नेले जाऊ शकतात का, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही 'नाही' असंच द्याल. मात्र पुणे विमानतळावर डब्यात परकीय चलन लपवून नेणाऱ्या दोन महाभागांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी एक कोटी 30 लाख रुपये किमतीचं परकीय चलन ताब्यात घेतलं आहे.
पुणे कस्टम विभागानं परदेशी चलनांची ही तस्करी पकडली. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश असून दोन्ही आरोपी एअर इंडियाच्या विमानाने पुणे विमानतळावरुन दुबईसाठी उड्डाण करणार होते. दोघांकडून 1 लाख 12 हजार 800 डॉलर जप्त करण्यात आले असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
निशांत विजय येतम नावाच्या आरोपीवर इमिग्रेशन अधिकाऱ्याला संशय आला. त्याची बॅगेची तपासणी केल्यानंतर तो नेत असलेल्या खाद्यपदार्थाच्या डब्यात काही रक्कम सापडली. त्यानंतर काही वेळेतच एच रंगलानी नावाच्या महिलेची बॅग तपासण्यात आली. त्यांच्याही बॅगेत काही परकीय चलन आढळलं. निशांत रायगडमधील नागोठण्याचा रहिवासी असून एच रंगलानी ही महिला मुंबईतील चेंबूरमध्ये राहते.
डब्यातून परकीय चलनाची तस्करी, पुणे विमानतळावर दोघांना बेड्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Aug 2017 08:15 PM (IST)
निशांत विजय येतम नावाच्या आरोपीवर इमिग्रेशन अधिकाऱ्याला संशय आला. त्याची बॅगेची तपासणी केल्यानंतर तो नेत असलेल्या खाद्यपदार्थाच्या डब्यात काही रक्कम सापडली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -