पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळण्यात आल्याची बाब समोर आली आहे. इयत्ता सातवी आणि नववीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मुघलांचा धडा वगळण्यात आला आहे.

या बदलांचं लेखक आणि पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या इतिहास विषय समितीचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी समर्थन केलं आहे. हा इतिहास महाराष्ट्राच्या दृष्टिक्षेपातून मांडण्यात आल्यानं त्यात काहीही चूक नसल्याचं मोरेंनी म्हटलं आहे.

इतिहासाच्या पुस्तकात मुघल आणि मुघल शासनपूर्वीच्या रजिया सुल्तान आणि मुहम्मद बिन तुघलक आदी मुस्लिम राज्यकर्त्यांचा पाठ्यपुस्तकात उल्लेख होता. तो नव्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आल्याची माहिती आहे.