पुणे: पुणे शहरातील समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी आणि तिच्या मित्राकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून एका 39 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात आत्महत्येस (Pune Crime News) प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव अतुल मारुती कदम (वय 39, रा. बालाजी कॉम्प्लेक्स, पिंपरी चौक, नाना पेठ, पुणे) असे असून, आरोपी म्हणून पत्नी सोनाली अतुल कदम (वय 31, रा. साडेसतरानळी, हडपसर) आणि तिचा मित्र कृष्णा शिंदे (रा. हडपसर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.(Pune Crime News)
वैवाहिक आयुष्यात सततचे वाद आणि संशय
मृताची आई माधुरी मारुती कदम (वय 61) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अतुल आणि सोनाली यांचा विवाह 2015 साली झाला होता. लग्नानंतर काही काळातच दोघांमध्ये घरगुती कारणांवरून वारंवार वाद व्हायला लागले. त्यातच सोनालीचे कृष्णा शिंदे या तरुणाशी अतिपरिचयाचे संबंध असल्याचा संशय अतुलला आला. त्यामुळे दोघांमधील मतभेद अधिक वाढत राहिले. अखेर सोनाली माहेरी राहायला निघून गेली.(Pune Crime News)
फोनद्वारे धमकी आणि मानसिक छळ
त्याआधीपासूनच, आणि विशेषतः विभक्त राहू लागल्यानंतर, सोनाली व कृष्णा दोघांनी मिळून अतुलला सतत फोन करून धमक्या देणे, मानसिक त्रास देणे सुरूच ठेवले. यामुळे अतुलवर मानसिक ताण वाढत गेला. या तणावाखाली 15 जून रोजी त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या प्रकरणी मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)
पोलिसांत गुन्हा दाखल
मुलाच्या मृत्यूनंतर आईने समर्थ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नी आणि तिच्या मित्राविरोधात भादंवि कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी तपास अधिकारी म्हणाले की, "आत्महत्येपूर्वी झालेल्या घटनांची सखोल चौकशी केली जात आहे. मोबाइल कॉल रेकॉर्ड, संदेश आणि इतर पुरावे गोळा केले जात आहेत. लवकरच संबंधित आरोपींना नोटीस बजावण्यात येणार असून, आवश्यक असल्यास अटक केली जाईल."