Pune News : देशविरोधी कृत्याच्या संशयावरुन पुण्यातून (Pune) दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. ATS ने ही कारवाई केली आहे. तर एक आरोपी फरार आहे. पुण्यातील कोथरूड परिसरातून सोमवारी मध्यरात्री दोघांना ताब्यात घेतलं आहे. दोन्ही तरुणांच्या लॅपटॉपमध्ये संशयास्पद माहिती आढळली आहे. या संशियत दोघांचे घर कोंढवा भागात आहे. त्या ठिकाणी पोलिसांकडून तपास सुरु आहे.
मध्य प्रदेशातील देशविधातक कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा पोलिसांना संशय
सध्या पुणे पोलिसांकडून सखोल तपास सुरु आहे. पुण्यातील कोथरुड भागात दोन दिवसांपूर्वी पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं.
त्या दोन्ही संशयितांकडे देशविधातक कृत्याच्या संशयावरुन पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या दोघांसोबत आणखी एक जण होता, तो पळून गेला आहे. या तिसऱ्या व्यक्तीच्या घरातून एक लॅपटॉप मिळाला असून, त्याच्यात देशविधातक कृत्यांसंदर्भात काही माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. मध्य प्रदेशातील काही देशविधातक कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. या पार्श्वभूमीवर एटीएस, गुप्तचर यंत्रणा त्या तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.
कोंढवा परिसरातील घरात तपास सुरु
पोलीस आयुक्त, सह आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपयुक्त यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी कोथरुड पोलिस ठाण्यात आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे. या संशियत दोघांचे घर कोंढवा भागात आहेत. त्या ठिकाणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. त्यांच्या घरात काही संशयास्पद सापडत आहे का? यासाठी पोलीस पथकाकडून शोध सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या: