बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड याने पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलं.  सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कराडवर गंभीर आरोप होत असून पवनचक्की प्रकल्पात दोन कोटींच्या खंडणी मागितल्याच्या प्रकरणात कराड मुख्य आरोपी आहे. मागच्या दोन दिवसापासून सीआयडी कस्टडीत असलेल्या वाल्मिक कराडची कस्टडीत असताना काल रात्री सुद्धा ऑक्सिजन लावावा लागला होता.


वाल्मिक कराड याला दुसऱ्या दिवशीही अर्ध्या तासासाठी ऑक्सिजन लावला गेला होता. मागच्या दोन दिवसापासून सीआयडी कस्टडीत असलेल्या वाल्मिक कराड याला कस्टडीत असताना रात्री सुद्धा ऑक्सिजन लावावा लागला होता. कस्टडीत असलेल्या वाल्मिक कराडला नियमित गोळ्या औषध घ्यावी लागतात, यातच दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याला रात्री अर्ध्या तासासाठी ऑक्सिजन लावण्यात आला होता. मागच्या दोन दिवसापासून कस्टडी मध्ये त्याची वैद्यकीय तपासणी झाली, रात्री वाल्मीक कराड यानी खिचडी खाल्ली.


मंगळवारी देखील लावला ऑक्सिजन 


बीड मधील संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीसमोर शरण आला. त्यानंतर वाल्मिक कराडची मंगळवारी रात्री वैद्यकीय पथकाने तपासणी केली, त्यांनी रात्री जेवण केलं नसून फक्त अर्धी पोळी खाल्ली असल्याची माहिती आहे. शिवाय वाल्मिक कराड यानी सकाळी नाष्टा केला नाही, वाल्मिक कराडला शुगर आहे. त्याचबरोबर त्याला रात्री श्वास घ्यायला त्रास झाल्यामुळे त्याला तात्पुरता ऑक्सिजन लावला गेला, सध्या वाल्मिक कराडची सीआयडी चौकशी सुरू आहे. तर काल देखील त्याला काही वेळ ऑक्सिजन लावण्यात आला होता.


 वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करा...- सचिन खरात


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते सचिन खरात यांनी वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करा, सगळंच बाहेर येईल असं म्हटलं आहे. बीड जिल्ह्यातील मसाजोग या गावामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाला, यामुळे महाराष्ट्राच्या हादरलेले आहे, यामुळे राज्याच्या प्रत्येक घरात एकच चर्चा आहे, सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे, बीड मधील नेते म्हणत आहेत, बीडची परिस्थिती बिहार सारखी झालेली आहे. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो, बीडची परिस्थिती गुंडांनी अफगाणिस्तान सारखी केलेली आहे. परंतु सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर वाल्मिक कराड यांच्यावर दोन तीन दिवसांनी खंडणीचा गुन्हा दाखल झाला, यानंतर वाल्मिक कराड हा फरार झाला, मग खरंच वाल्मिक कराड निर्दोष होता तर तो फरार का झाला त्यानंतर हाच वाल्मिक कराड स्वतः सरेंडर सीआयडी ऑफिसला पुण्यात झाला, त्यामुळे या सगळ्या बाबी संशयास्पद आहेत, त्यामुळे या वाल्मिक कराडची तात्काळ नार्को टेस्ट करा. मग सगळंच बाहेर येईल अशी मागणी सचिन खरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.


एन्काऊंटरही होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांचा दावा


मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या छोट्या आकाचा एन्काऊंटरही केला जाऊ शकतो. त्यामुळे या छोट्या आकाला वाचवा. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या छोट्या आकाचा एन्काऊंटर करू नका. मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्यासाठी असे होऊ शकते, अशी माहिती मला विश्वसनीय उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली आहे. यावरून काहीही होऊ शकते, अशी या प्रकरणात शक्यता व्यक्त होत असल्याचे त्यांनी म्हटले.